शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

यादीत नाव शोधण्यासाठी ज्येष्ठांची बँकेत कसरत; पेन्शनधारकांसमोर नवीन अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 11:49 IST

Bhandara : हयातनामा स्वाक्षरी करण्यासाठी लगबग

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : पेन्शनधारकांना ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात विहीत मुदतीत ज्या बँकेत आपल्या खात्यावर पेन्शन जमा होते तेथे जाऊन हयातनामा सादर करावा लागतो, याच पेन्शनधारकांना बँकेमध्ये गेल्यावर आपले नाव यादीत कुठे आहे, याची शोधाशोध करताना कसरत करावी लागत आहे. कारण, बँकेमध्ये केवळ एकच यादी आणि त्या यादीत असणारी नावे संबंधित पेन्शनधारकाच्या नावाच्या पहिल्या अक्षराने मांडली असल्याने ती शोधणे कठीण जात आहे.

काहीजण आडनावाप्रमाणे अक्षर शोधत आहेत, तर काहींना यादीतील नावे श्री, श्रीमती अशा नावापासून जोडून समाविष्ट केल्याने सापडणे कठीण होत आहे. यामुळे ज्येष्ठांची काहीशी कसरत होत आहे. जिल्ह्यात विविध शासकीय विभागातून तसेच शिक्षक आणि विविध पदावरून सेवानिवृत्त झालेल्यांची पेन्शन सेवानिवृत्ती वेतन जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयामार्फत पेन्शनधारकांनी नमूद केलेल्या बँकेच्या खात्यावर जमा होते. यात संबंधित पेन्शनधारक हयात आहेत की नाहीत, याची वर्षातून एकदा ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात शहानिशा करण्यासाठी त्यांना बँकेत जाऊन स्वाक्षरी करून हयातनामा द्यावा लागतो. यंदा ३० नोव्हेंबर अंतिम तारीख आहे. अशाच काही पेन्शनधारकांना विविध बँकेत गेल्यावर बँकेच्या सध्या सुरू असलेल्या वेगवेगळ्या कामांमुळे सोबतच बँकेत सेवक किंवा कर्मचारी यांच्याजवळ ती यादी ठेवण्यात आली आहे. यादीत नाव शोधणे, कधी ते नाव सापडत नाही, कधी याच नावाची सुरुवात श्री, श्रीमती अशा अक्षराने होत असल्याने ते सापडताना अडथळा येत आहे. यादीतील समाविष्ट नावे अशा प्रकारे शोधाशोध करावी लागत आहे. पण, अशावेळी एकच यादी आणि तीसुद्धा संबंधित बँकेच्या सेवक, कर्मचारी यांच्याजवळ असल्याने सेवानिवृत्तांना इकडून तिकडे जावे लागत आहे. 

आधार कार्ड आणण्यासाठी पुन्हा होतेय धावपळ यंदा बँकेत पेन्शनधारकांना त्यांचे आधार कार्ड झेरॉक्स देऊन यादीतील अनुक्रमांक टाकावा लागत आहे. अनुक्रमांक आणि नाव शोधण्यात वेळ जातोय. अनेक पेन्शनधारकांना आधार कार्ड सोबत द्यायचे आहे, याची कल्पनाच नसल्याने आधार कार्ड आणण्यास किंवा झेरॉक्ससाठी त्यांना पायपीट करावी लागत आहे, विशेषतः अनेक सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक यांना घरातील सदस्य सोबत नसतात. कधी आधार कार्ड सोबत नसते, यास सामोरे जावे लागत असल्याची कैफियत ज्येष्ठ नागरिकांनी मांडली.

जिल्ह्यात साडेबारा हजार पेन्शनधारकभंडारा शहरासह जिल्ह्यात पेन्शनधारकांची संख्या जवळपास सात हजारहून अधिक आहे. सर्वांची पेन्शन जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयामार्फत बिल अदा केल्यानंतर संबंधित पेन्शनधारकांच्या नमूद केलेल्या बँक खात्यात दर महिन्याला जमा होते.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनbhandara-acभंडारा