शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यादानाच्या पवित्र मंदिरात विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:15 IST

चार भिंतीच्या आड केवळ पुस्तकी ज्ञान मिळते. परंतु या पुस्तकी ज्ञानात विद्यार्थ्यांना मर्यादित न ठेवता निसर्गाच्या सानिध्यातून जीवन समृद्ध करण्याचा उपक्रम सध्या लाखनी तालुक्यातील निमगावच्या शाळेत सुरू आहे.

ठळक मुद्देस्किल इंडिया : निमगावच्या जिल्हा परिषद शाळेत पत्रावळी, द्रोण तयार करण्याचे प्रशिक्षण

मुखरू बागडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : चार भिंतीच्या आड केवळ पुस्तकी ज्ञान मिळते. परंतु या पुस्तकी ज्ञानात विद्यार्थ्यांना मर्यादित न ठेवता निसर्गाच्या सानिध्यातून जीवन समृद्ध करण्याचा उपक्रम सध्या लाखनी तालुक्यातील निमगावच्या शाळेत सुरू आहे. स्किल इंडियाला शोभेल असा हा उपक्रम असून विद्यार्थ्यांना पळसाच्या पानापासून पत्रावळी आणि द्रोण तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. या पत्रावळी आणि द्रोणांची अल्प दरात विक्री केली जात आहे.निमगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक डमदेव कहालकर हे उपक्रमशिल शिक्षक म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. विविध उपक्रम राबविताना आता त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जीवनविषयक कौशल्य निर्माण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. स्किल इंडिया ही शासनाची योजना असली तरी शालेय विद्यार्थ्यांपर्यंत ती पोहचली नाही. मात्र निमगावच्या शाळेतील विद्यार्थी स्किल इंडियाचा अनुभव घेत द्रोण आणि पत्रावळी लिलया तयार करीत आहे.ग्रामीण भागात पूर्वी पत्रावळीला मोठी मागणी होती. मात्र अलीकडे प्लॉस्टिकचा वापर वाढला. पळस आणि मोहा पानापासून तयार होणारी पत्रावळी हद्दपार झाली. परंतु शासनाने आता प्लॉस्टिकवर बंदी आणली. पर्यायाने लग्न समारंभात पानाच्या पत्रवाळीचा उपयोग होवू लागला. मात्र पत्रावळी तयार करणारे गावात कोणी उरलेच नाही. ही उणीव लक्षात घेवून मुख्याध्यापक डमदेव कहालकर, शिक्षक विजय डाभरे, रामकृष्ण कमाने, मीरा कहालकर, भास्कर गरपडे यांनी विद्यार्थ्यांना पत्रावळी तयार करण्याचे प्रशिक्षण निश्चय केला. आता विद्यार्थी पळसाच्या पानापासून पत्रावळी बनवित आहेत. गावाशेजारी माळरानावरून पळसाचे पाने तोडून आणून त्यापासून पत्रावळी तयार होत आहे. विद्यार्थीही उत्साहाने यात सहभागी होत आहेत.अल्प दरात पत्रावळीची विक्रीविद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या पत्रावळीची अत्यल्प दरात विक्री करण्याचा शिक्षकांचा मनोदय आहे. या उपक्रमातून हाती येणारा पैसा शाळा, परिसर विकासासाठी लावला जाणार आहे. शिक्षकांचा हा उपक्रम सर्वांसाठी कौतुकाचा विषय झाला आहे. निसर्गाशी नाते जोडत अनोख्या संस्कृतीशी सांगड घालणारा हा उपक्रम होय. शाळेत विद्यार्थी सकाळपासून उपस्थित राहून पत्रावळी तयार करतात. पत्रावळी आणि द्रोण कसे तयार करायचे यांचे त्यांना प्रशिक्षण दिल्या जातो. कौशल्य भारत, कुशल भारत योजना जणू निमगावच्या शाळेत शिक्षक राबवित असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Educationशिक्षण