शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
5
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
6
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
7
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
8
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
9
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
10
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
11
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
12
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
13
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
14
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
15
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
16
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
17
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
18
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
19
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
20
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...

४७ गावांची सुरक्षा दोन हवालदारांवर

By admin | Updated: April 21, 2016 00:31 IST

गोंदिया आणि बालाघाट या नक्षलग्रस्त जिल्ह्याच्या सिमेलगत हाकेच्या अंतरावरील सिहोरा पोलीस ठाण्यात केवळ दोनच पोलीस हवालदार कार्यरत असल्याचे धक्कादायक वास्तव निदर्शनास आले आहे.

रंजित चिंचखेडे चुल्हाड (सिहोरा)गोंदिया आणि बालाघाट या नक्षलग्रस्त जिल्ह्याच्या सिमेलगत हाकेच्या अंतरावरील सिहोरा पोलीस ठाण्यात केवळ दोनच पोलीस हवालदार कार्यरत असल्याचे धक्कादायक वास्तव निदर्शनास आले आहे. यामुळे नागरिकांना सुरक्षेची सेवा देताना पोलिसांना चांगलाच घाम फुटण्यास सुरूवात झाली आहे.४३ गावाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सिहोरा पोलीस ठाण्यात रिक्त पदांचा दुष्काळ आहे. पुरग्रस्त गोव, जंगलव्याप्त गावे तथा क्षेत्रफळाने मोठ्या असणाऱ्या या परिसरात पोलीस स्टेशन अंतर्गत ४ बीट निर्माण करण्यात आले आहे. दोन नक्षलग्रस्त जिल्ह्याची सिमा, मोकाट असणारी बपेरा आंतर राज्यीय, सिमा, मध्यप्रदेश राज्याला जोडणारा धरणाचा मार्ग नियंत्रणात ठेवताना रिक्त पदामुळे कार्यरत पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक तथा ५५ पोलीस कर्मचाऱ्याच्ंो पदे आहेत. परंतु ही पदे आजवर भरण्यात आली नाही. सध्यस्थितीत पोलीस ठाण्यात २८ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. यात पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षकसह दोन पोलीस उपनिरीक्षक सेवा बजावत आहे. बिट सांभाळण्याची जबाबदारी या पोलीस उपनिरीक्षकांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. याशिवाय पोलीस हवालदार या पदाचे फक्त दोनच पोलीस कार्यरत आहेत. तर उर्वरित कर्मचाऱ्यात दोन वाहन चालक, पोलीस नायक कार्यरत आहेत. यामुळे पदांची जबाबदारी नसताना अन्य पोलिसांना नागरिकांना सेवा आणि सुरक्षा प्रदान करण्यासाठी भार खांबावर घ्यावे लागत आहे. या पोलीस ठाण्यात महिला पोलिसांची एकाच आकड्यावर अडकून पडली आहे. महिला आरोपींना अटक व महिला फिर्यादीची समस्या जाणून घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे महिलासह पोलीस ही त्रस्त झाली आहेत. पोलीस ठाण्यात सुविधांचा अभाव आहे. पोलीस स्टेशन शेजारी पोलीस पाटील भवनाचे बांधकाम करण्यात आले आहे. जागेअभावी या भवनात पोलिसांना प्रशासकीय कामे करावी लागत आहे.पोलीस ठाण्यात महिला पोलिसांसाठी प्रसाधन गृहांचा अभाव आहे. यामुळे पोलीस ठाण्यात विकास मंदावला आहे. गेल्या अनेक वर्षापासून या पोलीस ठाणे आवारात नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले नाही. महिला आरोपीचे स्वतंत्र बंदीगृह बांधकाम प्रस्तापित करण्यात आले आहे.पोलीस ठाण्यात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. टी पार्इंट व बसस्थानक या गर्दीचे ठिकाणी त्यांची ड्युटी लावण्यात येत आहे. परंतु कामामुळे गर्दीचे ठिकाण सोडून त्यांना सेवा बजाविण्याची संकट आली आहे. यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचे राज्य मार्गावरून आवागमन धोक्याचे ठरत आहे. अल्प पोलीस कार्यरत असताना नागरिकांना सेवा आणि सुरक्षा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. महिला पोलीस तथा अन्य पोलिसांची रिक्त पदे भरण्याची गरज आहे.