शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत एसटीला 15 काेटींचा ताेटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 05:00 IST

भंडारा विभागांतर्गत भंडारा आणि गाेंदिया या दाेन जिल्ह्यांचा समावेश हाेताे. भंडारा, साकाेली, तुमसर, पवनी, गाेंदिया आणि तिराेडा हे सहा आगार आहेत. या सहा आगारांतर्गत ३६७ बस धावतात. मात्र, काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत एसटीचे चाक जागावर थांबले. १५ एप्रिल ते १ जूनपर्यंत प्रवासी वाहतूक पूर्णत: बंद हाेती. विशेष म्हणजे एप्रिल, मे आणि जून हे तीन महिने लग्नसराईचे आहेत. या काळात एसटी महामंडळाला प्रति दिवशी ३५ लाख रुपयांचे उत्पन्न हाेते; परंतु काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत या काळात ४५ दिवस बस बंद हाेती. 

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ऐन लग्नसराईच्या हंगामातच काेराेनाची दुसरी लाट आली. तब्बल ४५ दिवस एसटीचे चाक थांबले. या काळात प्रति दिवशी ३५ लाखांप्रमाणे एसटीच्या भंडारा विभागाला १५ काेटी ७५ लाख रुपयांचा ताेटा झाला. महामंडळाची बस सुरू झाली तरी वेग पकडायला मात्र आणखी बराच अवधी लागणार आहे. या ताेट्यामुळे महामंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दाेन महिन्यांपासून वेतन रखडले आहे.भंडारा विभागांतर्गत भंडारा आणि गाेंदिया या दाेन जिल्ह्यांचा समावेश हाेताे. भंडारा, साकाेली, तुमसर, पवनी, गाेंदिया आणि तिराेडा हे सहा आगार आहेत. या सहा आगारांतर्गत ३६७ बस धावतात. मात्र, काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत एसटीचे चाक जागावर थांबले. १५ एप्रिल ते १ जूनपर्यंत प्रवासी वाहतूक पूर्णत: बंद हाेती. विशेष म्हणजे एप्रिल, मे आणि जून हे तीन महिने लग्नसराईचे आहेत. या काळात एसटी महामंडळाला प्रति दिवशी ३५ लाख रुपयांचे उत्पन्न हाेते; परंतु काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत या काळात ४५ दिवस बस बंद हाेती. परिणामी, एसटी महामंडळाला १५ काेटी ७५ लाख रुपयांचा ताेटा झाला. आता ३६७ बसपैकी २९३ बस धावत आहे. प्रति दिवशी ९० हजार किलाेमीटरचे अंतर कापत आहे. मात्र, काेराेनाच्या ४५ दिवसांतील ताेटा भरून काढण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. एसटी महामंडळाला काेराेनाने फटका बसला. आता डिझेलचा दरवाढीचाही माेठा फटका बसत आहे.

दरराेज लागते १७ लाखांचे डिझेलकाेराेनानंतर एसटी पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. सध्या भंडारा आगारातील बस दर दिवशी ९० हजार किमी चालतात. त्यासाठी सरासरी १८ हजार लिटर डिझेल लागते. डिझेलचे दर ९८ रुपये प्रति लिटर असून दरराेज महामंडळाला १७ लाख ६४ हजार रुपये डिझेलसाठी खर्च करावे लागत आहेत. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी अवस्था सध्या आहे.

दाेन महिन्यांपासून पगार नाहीएसटी महामंडळाची बस धावायला लागली असली तरी दाेन महिन्यांपासून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पगारच झाला नाही. आधीच चालक वाहकांना कमी वेतन त्यात आता दाेन महिन्यांपासून वेतनच नसल्यामुळे कुटुंबाचा गाडा हाकणे माेठे कठीण झाले आहे. आता वेतन कधी हाेणार, याची प्रतीक्षा आहे.

डिझेल दर वाढले, तिकीट मात्र तेच- आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन दरवाढीचा फटका एसटी महामंडळाला बसत आहे. ६० रुपये प्रति लिटर डिझेलचे दर हाेते, तेव्हा तिकिटाचे दर हाेते तेवढेच आताही आहेत. उलट डिझेलचे दर ६० रुपयांवरून ९८ रुपयांवर पाेहाेचले आहे. दाेन वर्षांत तिकिटांचे दर मात्र वाढले नाही. डिझेलच्या वाढत्या दराचे गणित उत्पन्नाशी निगडित असून यामुळे सर्वाधिक ताेटा महामंडळाला सहन करावा लागत आहे.

भंडारा विभागात एसटी बस सुरू झाले आहे. प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद आहे. लग्नसराईच्या काळात बंद असलेल्या बसेसचा फटका महामंडळाला बसला आहे. प्रवाशांनी सुरक्षित प्रवाशासाठी एसटीनेच प्रवास करावा.- डाॅ. चंद्रकांत वडसकर विभागीय वाहतूक अधिकारी, भंडारा

 

टॅग्स :state transportएसटीcorona virusकोरोना वायरस बातम्या