शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

भाविकांची स्कॉर्पिओ उलटून एक ठार, नऊ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 16:41 IST

राष्ट्रीय महामार्गवर असलेल्या खड्ड्यांमुळे स्कॉर्पिओ उलटली. यात एकजण ठार झाला तर नऊजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देमाेहघाटची घटना : राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्याने घेतला पुन्हा बळी

भंडारा : राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यामुळे एका प्राध्यापकाचा बळी घेण्याच्या घटनेची शाई वाळत नाही तोच पुन्हा खड्ड्यांनी एका भाविकाचा बळी घेतला. खड्ड्यातून स्कॉर्पिओ उसळून उलटल्याने झालेल्या अपघातात छत्तीसगड राज्यातील एक भाविक ठार, तर नऊजण जखमी झाले. हा अपघात साकोली तालुक्यातील मोहघाटा येथे मंगळवारी सकाळी ५.३० वाजता घडला. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

घाशीराम धनेश साहू (वय ६०) रा. साखरी (छत्तीसगड) असे मृताचे नाव आहे. कमलेश ताम्रकार (४८), गुलाब ताम्रकार (६६), बदरून नेताम (६५), नारायण श्रीवास (६५), भरोसा सिन्हा (५८), कन्हैया हुबेकर (६६), छबिलाल शाहू (६०) आणि चालक राजू ताम्रकार (४०) अशी जखमींची नावे आहेत.

आठ दिवसांपूर्वी छत्तीसगड राज्यातील साखरी येथील दहाजण स्कॉर्पिओने देवदर्शनासाठी गेले होते. शेगाव, शिर्डीमार्गे जयपूर, जोधपूर येथे गेले होते. परतीच्या प्रवासात असताना साकोली तालुक्यातील मोहघाट जंगल शिवारातील राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले. एका मोठ्या खड्ड्यातून स्कॉर्पिओ उसळून उलटली. चारही चाके वर झाल्याने अपघातात घाशीराम जागीच ठार झाला, तर ९ जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती साकोली पोलिसांना देण्यात आलेली. ठाणेदार जितेंद्र बोरकर पथकासह घटनास्थळी पोहोचले. जखमींना साकोली उपजिल्हा रुग्णालयात आणले.

आठवडाभरात दुसरा बळी

साकोली येथे दुचाकीने परत येत असताना प्रा. प्रोफेसर बहेकार यांचा भीषण अपघात झाला होता. एका खड्ड्यातून त्यांची दुचाकी उसळल्याने ते खाली काेसळले आणि त्याचवेळी त्यांच्या अंगावरुन ट्रक गेला. ट्रकखाली चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. मंगळवारी पुन्हा खड्डे वाचवण्याच्या प्रयत्नात एका भाविकाचा मृत्यू झाला. प्राध्यापकाच्या अपघाती मृत्यूनंतरही प्रशासनाला जाग आली नाही. आठवडा लोटला तरी महामार्ग प्राधिकरणाने रस्त्यावरील खड्डे बुजविले नाही. कदाचित खड्डे बुजवले असते तर स्कार्पिओचा अपघात टाळू शकता आला असता.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूhighwayमहामार्गNational Highwayराष्ट्रीय महामार्ग