शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील शाळा प्रामाणिकपणे विद्यार्थी घडवितात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2022 05:00 IST

डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले,ओबीसींनी आपले संविधानिक हक्क मिळविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याशिवाय ग्रामीण भागातील नागरिक व विद्यार्थ्यांना त्यांचे अधिकार मिळणार नाही. ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन शिक्षण दिले पाहिजे, संस्थेतर्फे ॲड. अभिजित वंजारी व डॉ. बबनराव तायवाडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा (कोसरा) : शैक्षणिक क्षेत्रात खाजगी शाळांचे मोठे योगदान आहे. ते ग्रामीण भागात उत्तम प्रकारे शिक्षण देऊन चांगले नागरिक घडविण्याचे कार्य करीत आहे. असे प्रतिपादन आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी केले. पवनी तालुक्यातील कोंढा येथील गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात हरिकेश सभागृह व बास्केटबॉल कोर्टचे उद्घाटन शनिवार रोजी करण्यात आले. त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.यावेळी मुख्य पाहुणे म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष ॲड. आनंद जीभकाटे  होते. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष नरेंद्र कावडे, सहसचिव सुदाम खंडाईत, कोषाध्यक्ष मनोहर देशमुख, विश्वस्त विकास राऊत, प्रा. सुभाष पडोळे, देवानंद मोटघरे, ओबीसी महासंघाचे सचिव शरद वानखेडे, उपाध्यक्ष विनायक तुपकर, पंढरीभाऊ सावरबांधे, प्रकाश पचारे, संजीवनी जिभकाटे, प्राचार्य देवानंद चेटुले, मुख्याध्यापक ओमप्रकाश वैद्य, डॉ. खंडेलवाल, प्रा. सुधाकर बोरकर, डॉ. कल्पना बोरकर, प्राचार्य ममता गिऱ्हपुंजे उपस्थित होते. डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले,ओबीसींनी आपले संविधानिक हक्क मिळविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याशिवाय ग्रामीण भागातील नागरिक व विद्यार्थ्यांना त्यांचे अधिकार मिळणार नाही. ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन शिक्षण दिले पाहिजे, संस्थेतर्फे ॲड. अभिजित वंजारी व डॉ. बबनराव तायवाडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेतर्फे गांधी विद्यालय कोंढा येथील विद्यार्थी समीर हरिहर कुर्झेकर हा विद्यार्थी एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे  त्याची निवड झाली तसेच कोरोना काळात प्राथमिक आरोग्य केंद्र कोंढा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल बोरकर यांनी सेवा दिली म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन रतन लांडगे, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक ओमप्रकाश वैद्य यांनी केले. कार्यक्रमास गांधी शिक्षण संस्था कोंढा अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या सर्व शाळांतील विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अनेक शिक्षक व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.

 

टॅग्स :MLAआमदार