शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी शिक्षक न मिळाल्यास १ जुलैपासून आंदोलन करण्याचा पालकांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 13:42 IST

निवेदन : टवेपार येथील शाळा समिती व पालकांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : शहरालगतच्या टवेपार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गत वर्षभरापासून स्थायी शिक्षक नाही. शैक्षणिक सत्राला सुरुवात होत असतानाही जिल्हा परिषद शिक्षण विभाग याप्रकरणी गंभीर नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेत स्थायी शिक्षकाच्या मागणीसाठी टवेपार येथील शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामपंचायत पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. शिक्षण विभागाच्या बेपर्वाईविरोधात १ जुलैपासून शाळाबंद आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी यांना तक्रार निवेदनातून दिला आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टवेपार येथे एका शिक्षकाची स्थायी नियुक्ती करण्याबाबत ३ एप्रिल २०२३, २३ मे २०२३, ६ जून २०२३ व ४ मार्च २०२४ जिल्हा परिषद शिक्षण विभागाला पत्रव्यवहार करण्यात आला होता. परंतु, अद्यापही शिक्षण विभागाकडून स्थायी शिक्षकाची नियुक्ती झालेली नाही. यापूर्वी शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने २७ जून २०२३ आणि ४ मे २०२४ रोजी पत्र देऊन शाळाबंद आंदोलन करण्यात आले होते.

त्यानंतर शिक्षण विभागाच्यावतीने टवेपार शाळेत स्थायी नियुक्ती देण्यासंदर्भात जुन्या प्रभारी शिक्षकास शैक्षणिक कार्य करण्याकरिता आदेश दिलेले असल्याचे पत्राद्वारे कळविले गेले. त्यामुळे शाळा समिती, पालक व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी शाळाबंद आंदोलन मागे घेत प्रशासनाला सहकार्य केले होते. परंतु, सत्र २०२४- २५ ला सुरुवात झालेली आहे. मात्र, अद्यापही एका सहायक शिक्षकांची स्थायी नियुक्ती मिळालेली नाही. त्यामुळे शाळा समिती व पालकांत नाराजीचा सूर आहे.

मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नीता लुटे, उपाध्यक्ष शरद कडव, सदस्य भारती लुटे, गोपाल सेलोकर, सरपंच रिना गजभिये, प्रभू मते, रामसागर कातोरे, श्रीकांत मते, राजेश तिजारे, माया मेश्राम आदी पदाधिकारी व पालक उपस्थित होते.

प्रवेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी राहणार शुकशुकाटटवेपार येथील शून्य पटसंख्येची शाळा ग्रामस्थांनी नव्या दमाने सुरू केली. आज पटसंख्या वाढली असताना शिक्षण विभाग शाळेत स्थायी शिक्षक देण्यास उत्सुक नाहीत, ही गंभीर बाब आहे. त्यामुळे स्थायी शिक्षक मिळेपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्धार पालकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी शाळेत शुकशुकाट राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :School Reopening - GuideShalechi Taiyaribhandara-acभंडाराSchoolशाळा