उल्लेखनिय म्हणजे, वारंवार जिल्हा पाेलीसांमार्फत साेशल आर्थिक व्यवहारात कुणीही स्वत:चे पासवर्ड, सीबीसी नंबर किंवा व्यक्तीगत माहिती देवू नये असे आवाहन करण्यात येते. मात्र यानंतरही नागरिक अलगद जाळ्यात अडकत असल्याचे दिसून येत आहे.
पवनी येथील विनाेद जिभकाटे यांना याबाबत असाच अनुभव आला. जिभकाटे यांना विशाल अग्रवाल नामक इसमाने फाेन करुन माेबाईल क्रमांकावरील डीअर बीएसएनएल कस्टमर केवायसी रिनिव्हल पेन्डींग या टाेल फ्री नंबरवरुन काॅल केला. तसेच आपले केवायसी अपडेट करा, असा संदेश पाठविला. लगेच त्या इसमाने जिभकाटे यांना मी विशाल अग्रवाल बाेलत असून तुमच्या बिएसएनएल नंबरचा केवायसी अपडेट करायचे आहे. असे सांगितले.
यासाठी प्लेस्टाेरमध्ये ॲप ओपन करुन बिएसएनएल पाेस्टपेड रिचार्ज सर्च करायला सांगितले. याचवेळी जिभकाटे यांना माेबाईल हॅण्डसेट व बॅंक खात्याला लिंक असलेला माेबाईल क्रमांक मागितला. याचवेळी त्यांना माेबाईलमध्ये दहा रुपये अदा करा असा ऑप्शन आल्याने त्यांनी स्टेट बॅंक खात्यावरुन दहा रुपये पेड केले. पेमेंट हाेताच जिभकाटे यांच्या बॅंक खात्यातून तब्बल दाेन लक्ष २४ हजार ९९४ रुपये काढून त्यांची फसवणूक केली. रक्कम वटविल्याचा संदेश येताच जिभकाटे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच पवनी पाेलिसात तक्रार दाखल केली.
तक्रारीवरुन पवनी पाेलिसांनी विशाल अग्रवाल याच्या विरुध्द ४१९, ४२० भादंविच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पाेलीस निरीक्षक गायकवाड करीत आहे. वारंवार पाेलीस विभागातर्फे आवाहन करुनही नागरिक फसवणूकीच्या प्रकरणात बळी पडत असल्याचे दिसून येत आहे.
गॅस एजन्सीतून चाेरुन नेली राेख
तुमसर येथील साईरथ गॅस एजन्सीमध्ये अज्ञात इसमाने संधी साधून टेबलच्या ड्राॅव्हरमध्ये ठेवलेली राेख रक्कम उडविली. याप्रकरणी प्रियांक रामू डाेके यांच्या तक्रारीवरुन तुमसर पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याचे समजते. यात अज्ञात इसमाने गॅस एजन्सीच्या कार्यालयात प्रवेश करुन ड्राॅव्हरमध्ये ठेवलेली आठ हजार रुपयांची राेकड, १३ हजार रुपये किंमतीचा डीव्हीआर संगणक, प्रेशर रेगुलेटर, चार गॅस शेगडी असा एकुण ४९ हजार रुपयांचे साहित्य चाेरुन नेले. डाेके यांच्या तक्रारीवरुन तुमसर पाेलिसांनी घटनेची नाेंद केली आहे. तपास पाेलीस उपनिरीक्षक कुंभरे करीत आहेत.