शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
3
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
4
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
5
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
6
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
7
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
8
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
9
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
10
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
11
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
12
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
13
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
14
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
15
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
16
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
17
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
18
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
19
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
20
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

शनिवारचा आठवडी बाजार भरलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 23:04 IST

आठवडी बाजारातील भाजी विक्रेते व नगर पालिका प्रशासन यांच्यामधील बाजार भरविण्यासंदर्भात वाद गेल्या आठवड्याभरापासून धुमसत आहे. बुधवारपासून दररोज भरणारी गुजरी व शनिवारचा आठवडी बाजार भरलाच नाही.

ठळक मुद्देपवनी येथील प्रकार : ग्राहक निराशेने परतले

आॅनलाईन लोकमतपवनी : आठवडी बाजारातील भाजी विक्रेते व नगर पालिका प्रशासन यांच्यामधील बाजार भरविण्यासंदर्भात वाद गेल्या आठवड्याभरापासून धुमसत आहे. बुधवारपासून दररोज भरणारी गुजरी व शनिवारचा आठवडी बाजार भरलाच नाही. त्यामुळे दिडशे वर्ष पूर्ण झालेल्या नगरपालिकेच्या इतिहासात ही अभूतपूर्व घटना आहे. दोन नेत्यांच्या संघर्षात पवनीकर त्रस्त झाल्याचे चित्र नगरवासीयांना अनुभवायला मिळाले.गेली कित्येक वर्षाची परंपरा असलेले पवनी नगरातील आठवड्यातील दोन बाजाराचे दिवस शेतकरी, शेतमजूर, कामगार व भाजीविक्रेते यांच्यासाठी महत्वाचे आहे. एखादी दुर्देवी घटना घडली तरच पवनी पूर्णत: बंद राहते. परंतु तसे काही न होता बाजारात दिवसभर शुकशुकाट असणे नगराचे प्रतिष्ठेसाठी हिताचे नाही.रस्त्यावर बाजार भरल्यास अपघात होण्याची शक्यता एवढ्याशा विषयावरून रस्त्यावर बाजार भरविण्यास प्रतिबंध घालण्यात आला तर रस्त्यावर भाजी विक्रेत्यांना बसून व्यवसाय करू दिले नाही. या कारणासाठी आंदोलन उभे करण्यात आले. दोन्ही कारण अत्यंत शुल्लक आहेत. त्यासाठी जनतेला वेळीच धरण्यात आल्याचे चित्र म्हणजे राजकारण्यांनी त्यांची पोळी शेकून घेतली असे झाले आहे.सकाळच्या प्रहरी व्यापारी संघाने भाजी विक्रेते व किरकोळ विक्रेते यांनी बाजार चौकात त्यांचे दुकान सुरु करण्याचे आवाहन केले त्यानंतर दुपारच्या सुमारास वांगी व शेवग्याच्या शेंगाचा बाजारातील ओट्यावर दुकान लावून भाजी विक्रेत्यांनी त्यांचे दुकान सुरु करण्याचे आवाहन करण्यात आले.परंतु भाजी विक्रेत्यांनी आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. दिवसभर बाजारात शुकशुकाट राहिला. नगरपरिषद कार्यालयासमोरील शिवाजी चौकात भाजी विक्रेत्यांचे बुधवारपासून साखळी उपोषण सुरु आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आ.अ‍ॅड.रामचंद्र अवसरे यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला परंतु तोडगा निघालेला नाही त्यामुळे बाजार बंद राहिला.आंदोलन कर्त्यांचे विचारानुसार नगरपालिका प्रशासनाने उपोषण मंडपात पोहचून निवेदन स्वीकारावे व त्यांच्या मागण्या जाणून घ्याव्या. तर पालिका प्रशासनाच्या मते आंदोलनकर्त्यांनी कार्यालयात येऊन चर्चा करावी. दोन्ही बाजू त्यांचे मतावर काम असल्याने तोडगा निघालेला नाही. दोघांच्याही आडमुठ्या धोरणामुळे दररोज रोजीरोटीसाठी कमविणारा भाजी विक्रेता पिसल्या गेले आहेत, त्यामुळे भाजी बाजारामुळे नागरिक त्रस्त आहेत.बाजार पूर्ववत सुरू होणारपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिनिधी म्हणून भाजपचे भंडारा जिल्हा अध्यक्ष तारिकभाई कुरेशी यांनी भाजी विक्रेत्यांच्या उपोषण मंडप स्थळी भेट दिली. १८ पासून बाजार पूर्ववत सुरू करा शासनस्तरावर दखल घेऊन योग्य कारवाई करण्यात येणार आहे असा शब्द पालकमंत्री यांनी दिला असल्याचे सांगितले. आंदोलन कर्त्यांचे प्रमुख डॉ. राजेश नंदूरकर यांनी गोरगरीब भाजी विक्रेत्यांचा प्रश्न निकाली लागल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले असे सांगितले.बाजारचौकाच्या जागेत १५१ भाजीविक्रेते व अन्य किरकोळ वस्तू विक्रेते बसू शकतात. जागेअभावी वंचित राहणाऱ्यासाठी जुनी कोर्टाची इमारत जुनी कांजी हाऊसची इमारत व मच्छी बाजारात उपलब्ध होणारी जागा मोकळी करण्याचे काम सुरु करण्यात आलेली आहे. बाजारात जागा उपलब्ध झाल्यानंतर रस्त्यावर बाजार भरविल्या जाणार नाही.-माधुरी मडावीमुख्याधिकारी न.प. पवनी