शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
4
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
5
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
6
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
7
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
8
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
9
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
10
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
11
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
12
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
13
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
14
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
15
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
16
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
17
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
18
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
19
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
20
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा

सरपंचांचा आमदारांच्या निवासस्थानी ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:39 IST

प्रकरण पथदिव्यांच्या वीज देयकाचे ०५ लोक १८ साकोली : ग्रामपंचायत हद्दीतील पथदिवे व पाणीपुरवठा योजनेअंतर्गत थकीत व चालू वीज ...

प्रकरण पथदिव्यांच्या वीज देयकाचे

०५ लोक १८

साकोली : ग्रामपंचायत हद्दीतील पथदिवे व पाणीपुरवठा योजनेअंतर्गत थकीत व चालू वीज देयके शासनाने महावितरणला भरावे या मागणीला घेऊन साकोली, लाखनी तालुक्यांतील सरपंचांनी रविवारी आमदार नाना पटोले यांच्या निवासस्थानी ठिय्या दिला. यात दोन्ही तालुक्यांतील ग्रामपंचायत गावांतील खंडित असलेला पथदिव्यांचा वीज पुरवठा जोपर्यंत सुरू होत नाही, तोपर्यंत सरपंच संघटना मागे हटणार नाही, असा पवित्रा घेतला. वृत्त लिहीपर्यंत सरपंच ठाण मांडून होते. यावेळी आ. पटोले यांनी सरपंचांशी चर्चा केली.

शासनाच्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीने पथदिवे व पाणीपुरवठा योजनेचा चालू वीज भरणा स्वनिधीतून महावितरणला करावा, असा आदेश काढला. अगोदरच कोरोना काळात ग्रामीण भागांतही आर्थिक संकटाचा सामना करीत आलेले शेतकरी व सामान्यांचे कंबरडे मोडले. या परिस्थितीत ग्रामपंचायत तारेवरील कसरत करूनही ही देयके भरण्यास असमर्थ असतानाच महावितरणने दोन्ही तालुक्यांतील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा सुरू केला. पावसाळ्यात दोन्ही तालुक्यांतील ग्रामपंचायतींतील संपूर्ण गावे अंधकारमय होऊन गुन्हेगारीला थारा मिळेल अशा प्रकरणांची सुरुवात झाली आहे. रात्रीबेरात्री विषारी सरपटणारे प्राणी, जंगली हिंस्र पशू अंधारात गावात येण्याची दाट भीती ओढावली आहे.

शासन यापूर्वी पथदिव्यांच्या वीज देयक भरण्याकरिता शंभर टक्के अनुदान मंजूर करीत होते. आताही शासन स्तरावर पूर्ण अनुदान मंजूर करावे या मागणीला घेऊन साकोली व लाखनी तालुक्यांतील सर्व ग्रामपंचायत हद्दीतील सरपंचांनी आ. नाना पटोले यांच्या निवासस्थानी ठिय्या मांडला व निवेदन सादर केले. आ. पटोले यांनी यावर दूरध्वनीवर संबंधितांशी चर्चा करून ग्रामपंचायत हद्दीतील गावागावांतील विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी निर्देश दिले; पण साकोली व लाखनी सरपंच संघटना जोपर्यंत पथदिव्यांना वीज येत नाही, यावर अडून आहेत. यावेळी साकोली तालुका सरपंच संघटना अध्यक्ष पवनकुमार शेंडे, नयना चांदेवार, शालिक खर्डेकर, प्रेमकुमार गहाणे, लाखनी सरपंच संघटना अध्यक्ष म. वा. बोळणे, प्रशांत मासुरकर, संगीता घोनमोडे, केशव बडोले, कल्पना सेलोकर, सुधाकर हटवार, हरीश लांडगे, पुरुषोत्तम रूखमोडे, प्रल्हाद शेंदरे, मोहन लंजे, चतुर्भुज भानारकर, रवींद्र खंडाळकर, देवेंद्र लांजेवार, भूमिता तिडके, उषा डोंगरवार, माधुरी कटरे, चंदा कांबळे, सुनीता हटवार, रविता मेंढे, आशा लाडे, लीलाधर सोनवाने, मुकेश कापगते, राजकुमार कापगते, खेमेश्वरी टेंभरे, वनमाला सिंदीमेश्राम, सरिता राऊत, अनुसया कोकोडे, रेखा कावळे, हरिश्चंद्र दोनोडे, संजय बडवाईक, सुनीता समरीत, पूनम चांदेकर, वनिता बोरकर, शालू इळपाते, प्रतिभा रामटेके, अल्का उपरीकर, पमिता कापगते, समिता सयाम, रूपचंद हिरामण, भीमराव लांजेवार, विठ्ठल मसराम, सेवक भोंडे, नीता कोरे, कुंदना वाढई, संजीवनी गजभिये, बेबी मांदाडे, योगिता टेंभुर्णे, उशिका शेंडे, पुस्तकला उईके, गायत्री टेंभुर्णे, पुष्पा खोटेले, भिमावती पटले, कमला भेंडारकर, आदी उपस्थित होते.