शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचांचा आमदारांच्या निवासस्थानी ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 05:00 IST

शासनाच्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीने पथदिवे व पाणीपुरवठा योजनेचा चालू वीज भरणा स्वनिधीतून महावितरणला करावा, असा आदेश काढला. अगोदरच कोरोना काळात ग्रामीण भागांतही आर्थिक संकटाचा सामना करीत आलेले शेतकरी व सामान्यांचे कंबरडे मोडले. या परिस्थितीत ग्रामपंचायत तारेवरील कसरत करूनही ही देयके भरण्यास असमर्थ असतानाच महावितरणने दोन्ही तालुक्यांतील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा सुरू केला.

लाेकमत न्यूज नेटवर्कसाकोली : ग्रामपंचायत हद्दीतील पथदिवे व पाणीपुरवठा योजनेअंतर्गत थकीत व चालू वीज देयके शासनाने महावितरणला भरावे या मागणीला घेऊन साकोली, लाखनी तालुक्यांतील सरपंचांनी रविवारी आमदार नाना पटोले यांच्या निवासस्थानी ठिय्या दिला. यात दोन्ही तालुक्यांतील ग्रामपंचायत गावांतील खंडित असलेला पथदिव्यांचा वीज पुरवठा जोपर्यंत सुरू होत नाही, तोपर्यंत सरपंच संघटना मागे हटणार नाही, असा पवित्रा घेतला. वृत्त लिहीपर्यंत सरपंच ठाण मांडून होते. यावेळी आ. पटोले यांनी सरपंचांशी चर्चा केली.शासनाच्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीने पथदिवे व पाणीपुरवठा योजनेचा चालू वीज भरणा स्वनिधीतून महावितरणला करावा, असा आदेश काढला. अगोदरच कोरोना काळात ग्रामीण भागांतही आर्थिक संकटाचा सामना करीत आलेले शेतकरी व सामान्यांचे कंबरडे मोडले. या परिस्थितीत ग्रामपंचायत तारेवरील कसरत करूनही ही देयके भरण्यास असमर्थ असतानाच महावितरणने दोन्ही तालुक्यांतील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा सुरू केला. पावसाळ्यात दोन्ही तालुक्यांतील ग्रामपंचायतींतील संपूर्ण गावे अंधकारमय होऊन गुन्हेगारीला थारा मिळेल अशा प्रकरणांची सुरुवात झाली आहे. रात्रीबेरात्री विषारी सरपटणारे प्राणी, जंगली हिंस्र पशू अंधारात गावात येण्याची दाट भीती ओढावली आहे.यावेळी साकोली तालुका सरपंच संघटना अध्यक्ष पवनकुमार शेंडे, नयना चांदेवार, शालिक खर्डेकर, प्रेमकुमार गहाणे, लाखनी सरपंच संघटना अध्यक्ष म. वा. बोळणे, प्रशांत मासुरकर, संगीता घोनमोडे, केशव बडोले, कल्पना सेलोकर, सुधाकर हटवार, हरीश लांडगे, पुरुषोत्तम रूखमोडे, प्रल्हाद शेंदरे, मोहन लंजे, चतुर्भुज भानारकर, रवींद्र खंडाळकर, देवेंद्र लांजेवार, भूमिता तिडके, उषा डोंगरवार, माधुरी कटरे, चंदा कांबळे, सुनीता हटवार, रविता मेंढे, आशा लाडे, लीलाधर सोनवाने, मुकेश कापगते, राजकुमार कापगते, खेमेश्वरी टेंभरे, वनमाला सिंदीमेश्राम, सरिता राऊत, अनुसया कोकोडे आदी सरपंच उपस्थित होते.

सरपंच संघटना अडून - शासन यापूर्वी पथदिव्यांच्या वीज देयक भरण्याकरिता शंभर टक्के अनुदान मंजूर करीत होते. आताही शासन स्तरावर पूर्ण अनुदान मंजूर करावे या मागणीला घेऊन साकोली व लाखनी तालुक्यांतील सर्व ग्रामपंचायत हद्दीतील सरपंचांनी आ. नाना पटोले यांच्या निवासस्थानी ठिय्या मांडला व निवेदन सादर केले. आ. पटोले यांनी यावर दूरध्वनीवर संबंधितांशी चर्चा करून ग्रामपंचायत हद्दीतील गावातवीजपुरवठा सुरू करण्यासाठी निर्देश दिले. जोपर्यंत पथदिव्यांना वीज देत नाही, यावर सरपंच संघटना अडून आहेत. 

 

टॅग्स :sarpanchसरपंचNana Patoleनाना पटोले