शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

सरपंच अवॉर्डच्या प्रवेशिकांना प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 22:16 IST

गतवर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे दुसरे पर्व सुरु होत आहे़ यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सरपंचांना १५ जानेवारीपर्यंत ‘लोकमत’च्या जिल्हा अथवा विभागीय कार्यालयात आपले प्रस्ताव सादर करता येणार आहेत.

ठळक मुद्दे‘लोकमत सरपंच अवॉर्ड’: १५ जानेवारीपर्यंत प्रस्तावांची मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गतवर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे दुसरे पर्व सुरु होत आहे़ यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सरपंचांना १५ जानेवारीपर्यंत ‘लोकमत’च्या जिल्हा अथवा विभागीय कार्यालयात आपले प्रस्ताव सादर करता येणार आहेत.‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ हा बीकेटी टायर्स प्रस्तुत व पतंजली आयुर्वेद प्रायोजित ऐतिहासिक पुरस्कार ‘लोकमत’ने मागील वर्षापासून सुरु केला आहे. गतवर्षी अठरा जिल्ह्यात ही पुरस्कार योजना राबविण्यात आली होती़ त्यात पाच हजारहून अधिक गावांच्या सरपंचांनी सहभाग घेतला होता़सरपंचांनी विविध १३ क्षेत्रात केलेल्या कामांची पाहणी करुन या प्रत्येक क्षेत्रात अगोदर जिल्हा व नंतर राज्य स्तरावर आदर्श सरपंचाची निवड करण्यात आली होती. गतवर्षी विजेत्यांच्या गावांसाठी सरकारने विविध योजना जाहीर केल्या होत्या.पुरस्काराच्या कॅटेगरी आणि निकषजलव्यवस्थापन, वीजव्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण संवर्धन, प्रशासन/ई-प्रशासन/लोकसहभाग, रोजगार निर्मिती, कृषी तंत्रज्ञान, उदयोन्मुख नेतृत्व, सरपंच आॅफ द ईयर या १३ क्षेत्रात हे पुरस्कार दिले जाणार आहेत. या प्रत्येक क्षेत्रात सरपंचाने केलेले काम पाहून त्या-त्या क्षेत्रातील विजेते निवडले जातील. सरपंचांना ज्या विभागासाठी प्रवेशिका दाखल करावयाची आहे त्या कामांचा तपशील त्यांनी प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे. पुरस्कारासाठी २०१८ या एका वर्षात झालेली कामे विचारात घेतली जातील. १३ विभागांत नेमकी कोणती कामे अपेक्षित आहेत याचा तपशील प्रवेशिकेत नमूद आहे. अधिक माहितीसाठी लोकमत जिल्हा कार्यालय भंडारा (दूरध्वनी : ०७१८४ - २५२६३१) येथे संपर्क साधावा.पुरस्कारासाठीची प्रक्रिया‘लोकमत’ कार्यालयात प्रवेशिका उपलब्ध करुन दिल्या जातील.सरपंचांनी या प्रवेशिका भरुन पुन्हा कार्यालयात जमा करावयाच्या आहेत.प्रवेशिकांची छाननी करुन व प्रत्यक्ष गावांची पाहणी करुन ‘ज्युरी’ मंडळ जिल्हा पातळीवरील पुरस्कारांची घोषणा करेल.प्रथम जिल्हास्तरावर १३ पुरस्कार दिले जातील. त्यानंतर राज्यस्तरीय सोहळ्यात राज्याचे १३ पुरस्कार प्रदान होतील.अठरा जिल्ह्यांचा समावेशअकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, औरंगाबाद, लातूर, जालना, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या अठरा जिल्ह्यांत ही योजना राबविण्यात येत आहे.