शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
3
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
4
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
5
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
6
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
7
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
8
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
9
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
10
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
11
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
12
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
13
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
14
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
15
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
16
तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
18
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
19
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

महिला सरपंच-सदस्यांमध्ये ‘फ्रीस्टाईल’

By admin | Updated: May 7, 2015 00:25 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या बक्षीस वितरण सोहळ्याच्या मासिक सभेत हिसोब मागितल्याच्या

गोंदेखारी येथील प्रकार : प्रकरण तंमुसच्या हिशोबाचे चुल्हाड (सिहोरा) : महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या बक्षीस वितरण सोहळ्याच्या मासिक सभेत हिसोब मागितल्याच्या कारणावरुन महिला सरपंचाने विरोधी गटातील महिला सदस्याला मारहाण केली. ही घटना गोंदेखारी येथील ग्राम पंचायतीमध्ये घडली. यामुळे गावात वातावरण चांगलेच तापले आहे.सात सदस्यीय गोंदेखारी ग्राम पंचायतमध्ये सत्ताधारी गटाचे पाच तर विरोधी गटाचे दोन सदस्य आहेत. अल्का शेंडे या सरपंच पदी विराजमान आहेत. दरम्यान गावाला तंमुस आणि निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त झाले आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचा पुरस्कार वितरण सोहळा २४ एप्रिल ला घेण्यात आले. या पुरस्काराचे नियम धाब्यावर बसवून मर्जीतील लोकांना बक्षीसाची राशी वाटप करण्यात आली. यामुळे मर्जीतील लोकांना राशीचे वाटप झाले असल्याचे आरोप विरोधी गटाचे सदस्यांनी केला आहे. दरम्यान, मासिक सभा २८ एप्रिल ला आयोजित करण्यात आली. सभा सुरु असतांना राधा बनकर यांनी तंमुसच्या बक्षीस वितरण सोहळयात झालेल्या खर्चाची विचारणा केली. हिशोब मागितला असतांना सरपंच अल्का शेंडे यांनी हिशोब देण्यास नकार दिला. दोन तास शाब्दीक चकमक सुरु होती. यामुळे मासिक सभेत गोंधळ उडाला. सरपंच अल्का शेंडे यांनी बनकर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी बनकर यांनीही चांगलेच प्रत्युत्तर दिले. सदस्यांना मासिक सभेत हिशोब मागण्याचा अधिकार आहे.परंतु सत्ताधारी यात आलबेल करीत असल्याने विरोधी गटातील सदस्यांना हिशोब देण्यास नकार देत आहेत. असा आरोप विरोधी गटातील सदस्य करित आहेत. तर सरपंच पदाची गरिमा असतांना वारंवार सभेत उर्मट शब्दात महिला सरपंचाला विचारणा करण्यात येत आहे. विरोधी गटाचे सदस्य वाद उकरुन काढत आहेत. असा आरोप सत्ताधारी गटाचे पदाधिकारी करीत आहे. भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते गोवध्रन शेंडे यांच्या सरपंच अल्का शेंडे ह्या पत्नी आहेत. तर विरोधी बाकावर असणाऱ्या राधा बनकर या राकॉचे जेष्ठ कार्यकर्ते रामकृष्ण बनकर यांच्या पत्नी आहेत. या वादाने दोन महिला पदाधिकाऱ्यांची होणारी जुगलबंदी गावकरी अनुभवत आहेत. (वार्ताहर)विरोधी गटाचे महिला सदस्य तंमुसचा हिशोब अर्वाच्य भाषेत मागत होते. सरपंच पदाची गरिमा ठेवली नाही. यामुळे शाब्दिक चकमक झाली. त्यांना मारहाण केली नाही.-अल्का शेंडे सरपंच, गोंदेखारीतंमुसच्या मासिक सभेत हिशोब मागितला असता सरपंच धावून आल्या. त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यामुळे प्रत्युत्तर दिले. सरपंच विरोधात तक्रार देणार आहे.-राधा बनकरसदस्य, गोंदेखारी