शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

पवनीतील प्रकरणाने रेतीतस्करीची पोलखोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 5:00 AM

भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा, सूर, बावनथडी या नद्यांसह इतर घाटांवर मोठ्या प्रमाणात रेती उपलब्ध आहे. महसूल विभागाच्या वतीने दरवर्षी रेतीघाटाचे लिलाव केले जातात. मात्र गत काही महिन्यांपासून जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव रखडले आहेत. त्यामुळे तस्करांसाठी रान मोकळे आहे. नागपूरसह मध्यप्रदेशातील रेती तस्कर स्थानिकांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करताना दिसतात.

ठळक मुद्देतस्करांचे मनोबल वाढले : तहसीलदारांचे वाहन उडविण्यापर्यंत गेली मजल

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण यंत्रणा कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या कामात व्यस्त असताना दुसरीकडे जिल्ह्यातील बहुतांश रेतीघाटांवर रेती तस्करी जोमात सुरु आहे. कारवाईसाठी गेलेल्या पवनी तहसीलदारांचे वाहन टिप्परने उडविण्याचा प्रकार सोमवारी पहाटे घडला. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. तर या घटनेने जिल्ह्यातील रेती तस्करीची पोलखोल झाली.भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा, सूर, बावनथडी या नद्यांसह इतर घाटांवर मोठ्या प्रमाणात रेती उपलब्ध आहे. महसूल विभागाच्या वतीने दरवर्षी रेतीघाटाचे लिलाव केले जातात. मात्र गत काही महिन्यांपासून जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव रखडले आहेत. त्यामुळे तस्करांसाठी रान मोकळे आहे. नागपूरसह मध्यप्रदेशातील रेती तस्कर स्थानिकांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करताना दिसतात. तुमसर, पवनी तालुक्यातील रेती घाटावर अहोरात्र रेतीचा उपसा सुरु असतो. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनने संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात रेतीतस्करी थांबल्याचे दिसत होते. परंतु गत दोन आठवड्यांपासून पुन्हा रेती तस्करीने उचल खाल्ली आहे. मशीनच्या सहाय्याने उत्खनन करून त्याची ट्रक, टिप्परद्वारे वाहतूक केली जाते. महसूल आणि पोलीस यंत्रणा कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्याच्या कामात व्यस्त आहेत. याच संधीचा फायदा तस्कर घेत असल्याचे दिसत आहे.सोमवारी पवनी तालुक्यातील रेतीघाटावरून रेतीची तस्करी होत असल्याची माहिती तहसीलदार गजानन कोकड्डे यांना मिळाली. त्यांनी आपल्या पथकासह निलज येथे दोन टिप्पर थांबविले. चौकशी सुरु असताना ट्रक नागपूरकडे पळून जात होते. त्यावेळी टिप्परचा पाठलाग केला तेव्हा तहसीलदारांचे खासगी वाहन उडविण्याचा प्रयत्न टिप्परने केला. यात तहसीलदारांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले.सुदैवाने तहसीलदारांना दुखापत झाली नाही. या घटनेवरून रेती तस्करांचे मनोबल किती वाढले याचा अंदाज येतो. जिल्ह्यातील रेती तस्करीला अनेकांचे अभय असल्याचे बोलले जाते. महसूल आणि पोलीस यंत्रणाही या प्रकाराला तेवढीच जबाबदार आहे. दोन वर्षापूर्वी मोहाडी तालुक्यात पोलिसांच्या गस्ती पथकावर रेती तस्करांनी हल्ला केला होता. त्यात एक पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाला होता. अनेकदा महसूल पथकावरही हल्ले करण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र या रेती तस्करीला अर्थपूर्ण व्यवहारातून कुणीही पायबंद घालताना दिसत नाही.नागपूरच्या रेती तस्करांना अटकपवनी : तहसीलदारांच्या कारला धडक देऊन पळणाऱ्या रेती तस्करांना जेरबंद करण्यात पवनी पोलिसांना यश आले आहे. सोमवारी पहाटे कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदार गजानन कोकड्डे यांच्या खासगी वाहनाला रेती तस्करीच्या टिप्परने धडक देऊन पळ काढला होता. या प्रकरणी पवनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यावरून आरोपी मो.कलाम मो अजीज खान (३६), रबूल नयमुल खान (४०), अतेकुल रहमान कादीर खान (३२) सर्व राहणार खरबी नागपूर आणि सरफराज उर्फ कल्लू सकीम खान (२३) रा.नागपूर यांना अटक करण्यात आली. यासोबतच १० ब्रास रेती, दोन टिप्पर आणि एक स्कॉर्पीओ कार पोलिसांनी जप्त केली आहे.

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करी