शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

घाटाशेजारी रेतीचे डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 06:00 IST

अवैध डम्पिंगचा प्रकार गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. महसूल विभागातील तलाठ्यांपासून ते वरिष्ठांपर्यंत सर्वांना हा प्रकार माहित आहे. मात्र अद्यापपर्यंत रेती डम्पिंगप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. महसूल विभागाचे कारवाई थेट वाहनांवर केली जाते. त्याठिकाणी वसूली करता येते.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्र्लक्ष : मोहाडी व तुमसर तालुक्यात डम्पिंग

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नदीपात्रातून अवैधरित्या उत्खनन केलेल्या रेतीचे गावागावांत डम्पिंग केले जात असून अर्थपूर्ण संबंधातून महसूल प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. घाटाजवळील गावात डोंगरा एवढे रेतीचे ढिग कुणाच्याही दृष्टीस पडत असताना प्रशासनाला हा प्रकार दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सर्वाधिक रेती डम्पिंग मोहाडी आणि तुमसर तालुक्यात होत असल्याची माहिती आहे.भंडारा जिल्ह्यातील संमृद्ध नदीपात्र रेती तस्कारांसाठी पर्वणी ठरत आहे. प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जात असला तरी रेती तस्करी मात्र कमी व्हायचे नाव घेत नाही. तस्कारांचे एवढे मनोबल वाढले आहे की, आता गावागावांत रेतीची डम्पिंग केली जात आहे. मोहाडी तालुक्यातील खोडगाव, मोहगाव देवी, नेरी, रोहा, सुकळी, निलज, कान्हळगाव, मुंढरी, खमारी बुज. बेटाळा तर तुमसर तालुक्यातील तामसवाडी, सीतेपार, ब्राम्हणी, हरदोली, सक्करदार यासह घाटानजीकच्या गावात रेतीची डम्पिंग केली जाते. रात्री जेसीबीच्या सहायाने उत्खनन करून ट्रॅक्टरच्या मदतीने रेती गावानजीक आणली जाते. शेकडो ब्रास रेती रात्रीतून आणून साठविली जाते. त्यानंतर ही रेती तेथून विकली जाते. यासाठी गावानजीक काही तस्करांनी ठिय्या मांडला आहे. मोहाडी तालुक्यातील घाटानजीकच्या गावात रेतीचे डोंगर तयार झाले आहे. अहोरात्र या ठिकाणाहून रेतीची वाहतूक केली जाते.अवैध डम्पिंगचा प्रकार गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. महसूल विभागातील तलाठ्यांपासून ते वरिष्ठांपर्यंत सर्वांना हा प्रकार माहित आहे. मात्र अद्यापपर्यंत रेती डम्पिंगप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. महसूल विभागाचे कारवाई थेट वाहनांवर केली जाते. त्याठिकाणी वसूली करता येते. मात्र डम्पिंगच्या ठिकाणी वसुलीची सोय नसल्याने तेथे कारवाई होत नाही. याप्रकरणी वरिष्ठांनी लक्ष देवून डम्पिंग थांबविण्याची मागणी होत आहे.भंडारा जिल्ह्यातील बहुतांश रेतीघाटावर खुलेआम रेती उत्खनन केले जात आहे. महसूल विभागाने पथक तयार केले असले तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही. दुसरीकडे रेती तस्कर आक्रमक झाले असून हल्ला करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. गत काही महिन्यात पोलीस आणि महसूल पथकावर हल्ले झाल्यानंतरही प्रशासनाने ठोस पावले उचलली नाही. त्यामुळे रेती तस्करांचे मनोबल वाढले आहे. या रेती तस्करांच्या मुसक्या आवरण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे. वाहनांना जीपीएस प्रणाली लावून त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.जप्तीचे ट्रक जातात चोरीमहसूल पथकाने कारवाई केल्यानंतर ट्रक जप्त केले जातात. ते तहसील कार्यालयात लावले जातात. परंतु तुमसर तहसील कार्यालयातून अनेकदा जप्तीचे ट्रक चोरीस गेले आहे. महसूल अधिकारी याप्रकरणी पोलिसात तक्रार देवून मोकळे होतात. मात्र जप्तीचे ट्रक तेथून मुकसंमतीने पळविले जात असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे हेच ट्रक पुन्हा अवैध रेती वाहतूक करताना दिसून येतात.चालकाची भूमिका संशयास्पदवरिष्ठ अधिकाऱ्यांचे चालक तस्करीला खतपाणी घालत असल्याचे अनेक प्रकरणात दिसून येते. वरिष्ठ अधिकारी धाड टाकण्यासाठी ज्या मार्गावर जाणार असतात त्या मार्गावरील वाहन चालकांना पूर्व सूचना दिली जाते. यामुळे धाड टाकणे शक्य होत नाही. या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चालकांचे मोबाईल तपासले तर मोठे घबाड बाहेर येऊ शकते.

टॅग्स :sandवाळू