शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशातील रॉयल्टीवर घानोडच्या डंपिंगमधून रेतीचा उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2022 23:39 IST

घानोड गावात बंद असणाऱ्या डंपिंग यार्डमधून रात्री ट्रकमध्ये रेतीचा उपसा सुरू केला आहे. मध्यप्रदेशातील रॉयल्टीवर  घानोडच्या रेतीची नागपुरात वाहतूक केली जात आहे. याशिवाय वारपिंडकेपार आणि महालगावातून ट्रॅक्टरच्या मदतीने रेतीची चोरटी वाहतूक केली जात आहे. डंपिंग यार्डमध्ये रेतीची साठवणूक करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. अनधिकृत व्यवसाय बंद करण्यात येत असले तरी मोठे मासे खुलेआम रेतीची चोरी करीत आहेत. 

लाेकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : गत दोन वर्षांपासून बंद असणाऱ्या महाराष्ट्रातील घानोड गावातील डंपिंगमध्ये साठवणूक करण्यात आलेल्या रेतीचा उपसा मध्यप्रदेशातील रॉयल्टीवर करण्यात येत आहे. रात्रीला बेसुमार ट्रक सिहोरा परिसरातून धावत आहेत. महालगाव  आणि वारपिंडकेपार गावांच्या हद्दीतून रेतीची चोरटी वाहतूक सुरू झाली आहे. रेतीची चोरी थांबविणे आव्हान ठरले आहे. रेती, मुरूम चोरीत खननमाफियांचा उदय झाला असल्याचे चित्र परिसरात आहे.बावनथडी नदी पात्रातून रेतीचा उपसा केल्यानंतर महाराष्ट्राच्या हद्दीत असणाऱ्या घानोड गावाच्या लगत मध्यप्रदेशातील रेतीमाफियांनी डंपिंग यार्ड गत दोन वर्षांपूर्वी निर्माण केले आहे. राज्यात रेती घाट लिलावात काढण्यात आले नसल्याने या डंपिंग यार्डमधून रेती माफियांनी विक्री केली नाही. परंतु शेजारील मध्यप्रदेशातील कुंभली गावातील डंपिंग यार्डमधील रेती संपली असल्याने  माफियांनी रेतीची शोधाशोध सुरू केली आहे. मध्यप्रदेशातील गावात असणाऱ्या डंपिंग यार्डमधील रेती संपल्याने त्यांनी महाराष्ट्रात असणाऱ्या रेतीच्या डंपिंग यार्डकडे मोर्चा वळविला आहे. घानोड गावात बंद असणाऱ्या डंपिंग यार्डमधून रात्री ट्रकमध्ये रेतीचा उपसा सुरू केला आहे. मध्यप्रदेशातील रॉयल्टीवर  घानोडच्या रेतीची नागपुरात वाहतूक केली जात आहे. याशिवाय वारपिंडकेपार आणि महालगावातून ट्रॅक्टरच्या मदतीने रेतीची चोरटी वाहतूक केली जात आहे. डंपिंग यार्डमध्ये रेतीची साठवणूक करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. अनधिकृत व्यवसाय बंद करण्यात येत असले तरी मोठे मासे खुलेआम रेतीची चोरी करीत आहेत. सिहोरा परिसरातून जाणाऱ्या भंडारा बालाघाट या राष्ट्रीय महामार्गावर रोज ५० ते ६० ट्रक धावत आहेत. रेतीच्या चोरीत नवीन माफियांचा उदय झाला आहे. परिसरात रेती, मुरूम चोरीचा वाढता प्रकार सुरू झाला आहे. एका गावात तंमुसच्या अध्यक्षाने खुलेआम रेतीचा डंपिंग यार्ड तयार केल्याने परिसरात चर्चेचा विषय झाला आहे.

रस्ते खड्ड्यात, गावकरी वैतागले- सिहोरा परिसरात वैनगंगा, बावनथडी नद्याचे खोरे आहे. दोन्ही नद्यांच्या खोऱ्यातून रेतीचा बेसुमार उपसा सुरू झाला आहे. रेती, खननमाफियानी परिसरात थेट मोर्चा वळविला आहे. रेतीची ओव्हरलोडेड वाहतूक सुरू असल्याने रस्ते खड्ड्यात गेले आहेत. गावकरी रस्त्यावरील खड्ड्यामुळे वैतागले आहेत. या व्यवसायात राजकीय कार्यकर्ते, तंमुसचे अध्यक्ष गुंतलेले असल्याने गावकरी दबावात असल्याचे दिसून येत आहे.

 

टॅग्स :sandवाळू