शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

रस्त्याच्या कडेला रेतीचे ढिगारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 21:52 IST

जवळच्या ईंदुरखा गावाला रोहणा मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात इंदुरखा येथील रेती तस्करांनी अवैध रेती जमा केली असून रात्रीला दहा चाकी टीप्पर द्वारे नागपूर, मौदा येथे विक्री केल्या जात आहे. याकडे भंडारा तहसीलदाराचे पुर्णत: दुर्लक्ष आहे.

ठळक मुद्देभंडारा तहसीलदारांचे दुर्लक्ष : रात्रीला होते रेतीची विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : जवळच्या ईंदुरखा गावाला रोहणा मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात इंदुरखा येथील रेती तस्करांनी अवैध रेती जमा केली असून रात्रीला दहा चाकी टीप्पर द्वारे नागपूर, मौदा येथे विक्री केल्या जात आहे. याकडे भंडारा तहसीलदाराचे पुर्णत: दुर्लक्ष आहे.स्थानिक गावातील पुढाºयांना मलाई खायला मिळत असल्याने तेही डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहेत. राखी पौर्णिमेच्या वेळेस सुरनदीला पूर आल्याने मोठ्या प्रमाणात शुभ्र वाळू वाहत आली याचाच फायदा घेत इंदुरखा येथील वाळु तस्करांनी ट्रॅक्टरद्वारे वाळु काढून रोहणा - इंदुरखा रस्त्याच्या कडेला जमा करुन विक्रीचा गोरखधंदा सुरु केला आहे.दिवसभर १० ते १५ ट्रॅक्टरद्वारे सुरनदीमधील बारिक वाळु काढून रस्त्याच्या कडेला जमा केली जाते. यावेळी वाळू तस्करांचे मजूर तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, एस.डीओ महसुल यांचे कार्यालय व मुख्य रस्त्यावर बसले असतात. दिवसभर व रात्री १० वाजतापर्यंत रेती जमा झाल्यानंतर पहाटे ४ वाजता ट्रकांना बोलावून प्रती ट्रक ५ हजार रुपये प्रमाणे वाळू विकल्या जात आहे.र्इंदुरखा गावातीलच एका तरुणाची जेसीबीअसून तो प्रती ट्रक भरण्यासाठी १ हजार रुपये घेतो. वाळू भरलेले ट्रक रेल्वे पुल व र्इंदुरखा- कोथुर्णा मार्गावर रेल्वे चौकी असल्याने रोहणा मार्गे दहेगाव वरुन नागपूरला पाठविल्या जात आहे. रेती तस्करांना मुख्य रस्त्यापर्यंत ट्रक पोहचवायचे राहत असल्याने रोहणा व दहेगाव येथे दोन रेती तस्कर रात्रभर जागत असतात. यात प्रती ट्रक पाच हजार रुपये वाळू तस्करांना मिळत असल्याने ते गब्बर झाले असून रांत्रदिवस मद्य प्राशन करुन असतात.एखाद्या व्यक्तीने वाळू चोरीबद्दल त्याला हटकले तर शिवीगाळ करुन मारायला धावतात. मध्यप्रदेशातील रॉयल्टी खापा येथून खरेदी करुन ट्रक मालक र्इंदुरखा येथुन वाळु भरुन नागपूरला १८ हजार रुपये मध्ये विकत आहेत. भंडारा ते नागपुरपर्यंत एखादा अधिकाºयाने ट्रक पकडल्यास ट्रक ड्रायव्हर मध्यप्रदेश मधून वाळू खरेदी केल्याचे सांगून रॉयल्टी दाखवितात व त्या अधिकाºयांची दिशाभुल करीत असल्याचेही सांगतात.