११४२ पैकी १०१२ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 05:00 AM2020-05-23T05:00:00+5:302020-05-23T05:00:54+5:30

जिल्हा रुग्णालयात स्थापन करण्यात आलेल्या आयसोलेशन वॉर्डातून आतापर्यंत २६३ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे. साकोली, तुमसर व मोहाडी तालुक्यातील कोवीड केअर सेंटरमध्ये २९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये भरती आहेत. रुग्णालय क्वारंटाईनमधून आतापर्यंत ६१७ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे.

Samples of 1012 out of 1142 persons were negative | ११४२ पैकी १०१२ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह

११४२ पैकी १०१२ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह

Next
ठळक मुद्देआयसोलेशन वॉर्डातून २६३ जणांना सुटी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभावी उपाययोजना केल्या आहे. कोरोना विषाणू तपासणीअंतर्गत आतापर्यंत ११४२ व्यक्तींचे घशातील नमूने घेण्यात आले असून त्यापैकी १०१२ व्यक्तींचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नऊ आहे.
जिल्हा रुग्णालयात स्थापन करण्यात आलेल्या आयसोलेशन वॉर्डातून आतापर्यंत २६३ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे. साकोली, तुमसर व मोहाडी तालुक्यातील कोवीड केअर सेंटरमध्ये २९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये भरती आहेत. रुग्णालय क्वारंटाईनमधून आतापर्यंत ६१७ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात ८५ हजार २६५ नागरिकांनी आरोग्य सेतू हे अ‍ॅप डाऊनलोड करीत त्याचा लाभ घेत आहेत. शुक्रवारला आयसोलेशन वॉर्डात १७ व्यक्तींना भरती करण्यात आले. गुरूवारी ८१ व्यक्तींचे घश्यातील स्वाबचा नमूना नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला. १२१ जणांचा अहवाल अजुनही अप्राप्त आहे. फ्ल्यु ओपीडीअंतर्गत तीव्र श्वासदाहचे एकूण १३९ व्यक्तींना भरती करण्यात आले असून त्यांचे नमूने पाठविण्यात आले होते. त्यापैकी १३६ नमूने निगेटिव्ह असून दोन जणांचा अहवाल अप्राप्त आहे.
जिल्ह्यातील नऊ शासकीय वसतीगृहांमध्ये ठेवण्यात आलेल्या मजूर व स्थलांतरीत लोकांची मानसीक तपासणी व समोपदेशन जिल्हा सामान्य रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञांमार्फत केली जात आहे. तसेच त्यांना योगा प्रशिक्षणसुद्धा देण्यात आले आहेत. फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम सर्वांनी पाळावे याचीही दक्षता घेतली जात आहे.

सहा दिवस दुकाने सुरू
भंडारा पालिकेचे मुख्याधिकारी यांनी काढलेल्या सुधारित आदेशानुसार भंडारा शहरातील दुकाने आता सहा दिवस उघडी राहणार आहे. मंगळवारी दुकाने बंद राहणार आहे. मात्र आवश्यक वेळी गरजेप्रमाणे नियमात बदल केले जाणार आहे.

Web Title: Samples of 1012 out of 1142 persons were negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.