शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

बनावट हमीपत्राने जनावरांची विक्री, ३.८० कोटींनी शासनाची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 11:05 IST

Bhandara : पाच गोशाळांच्या ३३ संचालकांविरूद्ध लाखनी पोलिसांत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : गोंदिया, नागपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांतील विविध पोलिस ठाणेअंतर्गत सन २०१८ ते आजपावेतोच्या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेली जनावरे पोलिसांनी पाच गोशाळांमध्ये जमा केली होती. परंतु, पाच गोशाळांनी न्यायालयाचे आदेश न घेता बनावट हमीपत्रांवर परस्पर जनावरे विकून शासकीय मालमत्तेची अफरातफर केली. शासनाची ३ कोटी ८० लाख ५५ हजारांने फसवणूक केली. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी पाच गोशाळांच्या ३३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जिल्ह्यात सन २०१८ ते आजपावेतो जनावरांची कत्तलीसाठी अवैधरीत्या वाहनांमधून वाहतूक करताना पोलिस दलाकडून पकडून कारवाई केली जाते. वाहनात कोंबून क्रूरपणे वाहतूक होत असलेल्या जनावरांची मुक्तता करून त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी गोशाळांमध्ये दाखल केले जाते. मात्र, या जनावरांना गोशाळांमध्ये सुरक्षित वातावरणात ठेवले जात नाही, याबाबत भंवरलाल जैन यांनी राज्य मानवी हक्क अधिनियमानुसार तक्रार केली होती. तक्रारीवर भंडारा स्थानिक गुन्हे शाखेद्वारे चौकशी करण्यात आली. यात मोठे घबाड उघड झाले. 

भंडारा, गोंदिया, नागपूर व गडचिरोली जिल्हा पोलिसांनी २०१८ पासून वेळोवेळी कारवाई करून अवैध जनावरांच्या वाहतुकीतून पकडलेली जनावरे वेगवेगळ्या गोशाळांमध्ये पाठवली होती. पकडलेली जनावरे अन्नपूर्णा गौरक्षण संस्था, भवानी गोशाळा, निर्मल गोशाळा, सुखरूप गोशाळा पिंपळगाव सडक आणि मातोश्री गोशाळा रेंगेपार-कोहळी या गोशाळांना सोपविलेली होती. मात्र, गोशाळांच्या पदाधिकाऱ्यांनी जमा केलेली जनावरे न्यायालयाचा आदेश प्राप्त न करता बनावट हमीपत्र लिहून परस्पर विकली. या प्रकरणात ३ कोटी ८० लाख ५५ हजार रुपयांची जनावरे विकून शासकीय मालाची अफरातफर केली आहे. 

याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक आशिष चिलांगे यांच्या चौकशी अहवालावरून लाखनी पोलिसांनी पाचही गोशाळांच्या एकूण ३३ जणांवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ४०६,४२०,४६७,४७१,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक हृदयनारायण यादव करीत आहेत. 

यांच्याविरुद्ध झाला गुन्हा दाखल याप्रकरणात लाखनी पोलिसांनी ३३ जणांवर गुन्हा दाखल केला. त्यामध्ये मंगेश राघोते (४०), विनोद बेहरे (४२), धनंजय दिघोरे (४३), मनोज राघोर्ते (४०), अजय मेश्राम (४५), सविता भुते (४०), झांसी राघोते (४२), राजेश्वर कमाने (४३), माणिक जिवतोडे (४०), नाना जिवतोडे (४२), भागवत शिवणकर (४१), भोपेश ब्राह्मणकर (४२), धनराज दिघोरे (४२), दिनेश भाजीपाले (४०) प्रभाकर जिवतोडे (४०), सुरेश कापगते (४१), शिवराम गिरेपुंजे (४२), पांडुरंग कापगते (४२), यशपाल कापगते (३८), शंभूभाई पटेल (४२), राकेश सार्वे (४२), ओमप्रकाश लांजेवार (४०), भास्कर भोतमांगे (४०) सचिन नागलवाडे (४५) ओमप्रकाश भोतमांगे (४१), शामराव चारमोडे (४२), नरेश पिंपळशेंडे (४३), मंगेश तरोणे (४०), कैलास काळसर्पे (४२), राकेश कटाणे (४२) विनोद भोंडे (४३) वामन कमाने (४०), रवींद्र काळसर्पे (४२) सर्व रा. पिंपळगाव/सडक यांचा समावेश आहे.

टॅग्स :bhandara-acभंडाराAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार