रस्त्यावरच भरतो साकोलीचा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 06:00 AM2020-02-19T06:00:00+5:302020-02-19T06:00:47+5:30

साकोलीचा आठवडी बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर, एकोडी रोड व राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला भरत होता. अपघाताच्या संख्येत वाढ झाल्याने नगरपरिषदेने आठवडी बाजार पटाच्या दानीवर भरविण्याचा निर्णय घेतला. यासाठी पटाच्या दानीवर असलेला कचरा ट्रॅक्टरच्या सहाय्याने साफ करुन तिथे प्रकाशव्यवस्था करण्यात आली.

Sakoli Market is filling the streets | रस्त्यावरच भरतो साकोलीचा बाजार

रस्त्यावरच भरतो साकोलीचा बाजार

Next
ठळक मुद्देलाखोंचा खर्च : जनतेच्या पैशाची उधळपट्टी

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : येथील आठवडी बाजार महामार्गावरुन थेट शंकरपटाच्या मैदानावर गतवर्षीपासून हलविण्यात निर्णय घेण्यात आला होता. मात्र तेथील सुविधांच्या अभावी हा आठवडी बाजार पुन्हा राष्ट्रीय महामार्गावरच भरु लागला आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपये खर्च करण्याचे काय कारण, ही तर आहे असा संतप्त सवाल नागरिक करु लागले आहेत.
साकोलीचा आठवडी बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर, एकोडी रोड व राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला भरत होता. अपघाताच्या संख्येत वाढ झाल्याने नगरपरिषदेने आठवडी बाजार पटाच्या दानीवर भरविण्याचा निर्णय घेतला. यासाठी पटाच्या दानीवर असलेला कचरा ट्रॅक्टरच्या सहाय्याने साफ करुन तिथे प्रकाशव्यवस्था करण्यात आली. यामध्ये नगरपरिषदेतर्फे लाखो रुपये खर्च केले. उन्हाळ्याच्या दिवसात सलग दोन ते तीन महिने आठवडी बाजार पटाच्या दानीवर भरला. मात्र या पटाच्या मैदानावर नगरपरिषदेने मुरुम टाकला नाही. परिणामी पहिल्याच पावसात बाजाराच्या ठिकाणी ठिकाणी चिखल झाला.
चिखलाने ग्राहकांची संख्या रोडावली. त्यामुळे भाजीविक्रेत्यांनी पुन्हा आपआपली दुकाने जुन्याच ठिकाणी लावणे सुरु केल्याने आता आठवडी बाजार जुन्याच ठिकाणी भरणे सुरु झाले. आठवडी बाजार जुन्याच ठिकाणी भरवायचा होता तर नगरपषिदेने पटाच्या मैदानावर लाखो रुपयांची उधळपट्टी कशाला केली आता पुन्हा या ठिकाणी बाजार भरवायचा झाल्यास यासाठी पुन्हा लाखो रुपये पाण्यात जातील काय? असे बोलले जात आहे.

Web Title: Sakoli Market is filling the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार