शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

सखी मतदान केंद्रानी वाढविला महिलांचा सन्मान महिलांनी घेतली सेल्फी : इतरांना मतदानासाठी पाठविले संदेश

By युवराज गोमास | Updated: April 19, 2024 17:31 IST

Lok Sabha Election 2024: भंडारा -गोंदिया लोकसभा मतदार संघात महिलांसाठी ११ सखी मतदान केंद्राची विशेष सुविधा, महिलांचा सन्मान वाढविण्याचा प्रयत्न

भंडारा : जिल्ह्यात भंडारा -गोंदिया लोकसभा मतदार संघात ११ महिला मतदान केंद्राची विशेष सुविधा पुरविण्यात आली. महिलांचा सन्मान वाढविण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला. या मतदान केंद्रांचे सर्व प्रकारचे संचालन व व्यवस्थापन महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांभाळले. मतदान केंद्र सजविण्यात आले होते. आकर्षक कमानी उभारून महिलांचे स्वागत करण्यात आले. महिलांनी आनंदाने मतदान करीत मतदानाची निशाणी दाखविणारी सेल्फी घेत इतर महिलांना मतदानाचे संदेश पाठविले.

तुमसर विधानसभा मतदार संघात बोथली, वरठी, खैरलांजी, मेहगाव आदी सखी मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली. भंडारा विधानसभा मतदार संघात जि. प. शाळा वाही, ग्रामपंचायत कार्यालय खोकरला, सेंट पॉल स्कूल भंडारा येथे तर साकोली विधानसभा मतदार संघात विकास हायस्कूल पवनी, जिल्हा परिषद हायस्कूल लाखांदूर, समर्थ महाविद्यालय मुरमाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकोली येथील केंद्रांचा सखी मतदान केंद्रात समावेश होता.

खोकरला येथील मतदान केंद्रावर राष्ट्रीय महोत्सव, 'मी करणार मतदान, सुस्वागतम्', अशी वाक्य लिहलेल्या गेटस् उभारण्यात आल्या होत्या. महिलांसाठी बैठक व थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती. महिला कर्मचारी आनंदाने मतदानासाठी येणाऱ्या महिलांचे स्वागत करताना दिसून आल्या. सेल्फी पॉईंटची खास सुविधा उभारण्यात आली होती. त्यावर आम्ही भंडारावासी १०० टक्के मतदान करू, असे वाक्य ठळकपणे लिहले गेले होते. सेल्फी काउंटर फुग्यांनी सजविण्यात आले होते. त्याचखाली 'ओ भाऊ मी मतदान करणार, तुम्ही पण मतदान करा', असे आवाहन करण्यात आले होते. मतदानावेळी असुविधा होऊ नये, याची विशेष खबरदारी घेतली जात होती.

वृद्ध व दिव्यांगांना मदतीचा हातवृद्ध व दिव्यांगासाठी व्हिलचेअरची सुविधा देत मदतीचा हात पुढे केला जात होता. पोलिस कर्मचाऱ्यांचा व अन्य अधिकारी, कर्मचारी तैनातीला होते. वृद्ध, अपंगांनी मतदान केल्यानंतर आनंद व्यक्त केला. मतदार भारविल्याचे चित्र पहावयास मिळाले.

नववधूसारखे सजले मतदान केंद्रसेंट पॉल स्कूल येथील सखी मतदान केंद्र आकर्षक फुग्यांच्या कमानीने सजविण्यात आले होते. हिरवी मॅट अंधारली गेली होती. नववधूसारखे केंद्र सजविण्यात आले होते. महिला मतदारांनी सुविधांचा लाभ घेत भरभरून मतदान केले. सेल्फी पाईंटवर मतदानाचे फोटो काढून इतरांना मतदानासाठी सोशल माध्यमावरून पाठविले. एकंदर सखी मतदान केंद्रावर उत्साहाचे वातावरण पहावयास मिळाले.

महिलांनी सांभाळल्या विविध जबाबदाऱ्याभंडारा जिल्ह्यात महिलांसाठी ११ विशेष मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. या मतदान केंद्रांची संपूर्ण जबाबदारी महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे होती. मतदान केंद्राध्यक्ष ते मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांपर्यंतचे संपूर्ण कामकाज महिलांनी सांभाळले. दिवसभर येथील मतदान केेंद्राचे वातावरण उत्साहपूर्ण होता.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४bhandara-gondiya-pcभंडारा-गोंदिया