शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमध्ये 'सखी सावित्री' करणार विद्यार्थ्यांची सुरक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 11:19 IST

Bhandara : मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी समितीचे गठन

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी सर्व शाळास्तरावर सखी सावित्री समिती स्थापन करण्याचे निर्देश राज्य सरकारने शिक्षण विभागाला दिलेले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील १२९७ शाळांमध्ये या समितीची स्थापना करण्यात आली. यातील काही शाळांमध्ये ही समिती नावापुरतीच असल्याची माहिती आहे. त्यामुळे शासन निर्णयांची शाळामध्ये अंमलबजावणी होत आहे का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

शाळांत विद्यार्थ्यांच्या काही समस्या असतील तर ही समिती त्याची दखल घेऊन त्यावर कार्यवाही करणार. त्यामुळे विद्यार्थी निर्भयपणे शाळेत मुक्त वावरू शकतील. मात्र अनेक शाळांमध्ये सखी सावित्री समिती ही केवळ कागदोपत्रीच असल्याचे दिसून येत आहे. समिती स्थापन झाल्यावर प्रत्यक्ष कार्य सुरू होणे आवश्यक आहे. 

बालकांचा मूलभूत हक्कसर्व बालकांना मूलभूत मानवी हक्क मिळविण्याचा अधिकार आहे. जसे जीविताचा अधिकार, शारीरिक आणि बौद्धिक सुप्त गुणांचा विकास करण्याचा अधिकार, बालविकासावर परिणाम होईल अशा प्रभावापासून संरक्षणाचा मिळविण्याचा बालकांना हक्क आहे

जिल्ह्यात १ हजार २९७ शाळा जिल्हा परिषदेच्या १ हजार २९७ शाळा असून, त्यापैकी सर्वच शाळांमध्ये सखी सावित्री समिती स्थापन केली. • या समिती स्थापनमध्ये माध्यमिक, नगरपरिषद शाळांचा समावेश आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार समितीचे कार्य सर्व शाळेला समजावून सांगण्यात आल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

सखी सावित्री' समितीची कार्ये 

  • शाळाबाहेर मुला-मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करणे. 
  • मुला-मुलींचे व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे, शिक्षणासाठी असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती देणे. मुला-मुलींना करिअरसंबंधी मार्गदर्शन करणे. मुलींच्या स्व-संरक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे. 
  • मुला-मुलीसोबत आरोग्यदायी सवयीसाठी संवाद साधणे. • बालविवाह रोखून, पालकांमध्ये जनजागृती निर्माण करणे 
  • सामाजिक, भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील मुला- मुलींच्या शिक्षणासाठी मदत करणे. 
  • शाळेत समतामूलक वातावरणासाठी लिंगभेदविरहित व समावेशक उपक्रम राबवणे, विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्याही अत्याचाराला बळी पडणार नाहीत अशी निकोप वातावरण निर्मिती करणे.

सखी सावित्री समिती रचनाशाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अध्यक्ष, महिला शिक्षक सदस्य, समुपदेशक-सदस्य, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ (महिला) सदस्य, अंगणवाडी रोविका सदस्य, पोलिस पाटील सदस्य, ग्रामपंचायत सदस्य (महिला) - सदस्य, पालक (महिला)-सदस्य, विद्यार्थी (२ विद्यार्थिनी व २ विद्यार्थी) सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक सदस्य सचिव असतात.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाbhandara-acभंडारा