शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाची सुरक्षा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2022 05:00 IST

सोंड्याटोला प्रकल्पात सहा आणि चांदपूर जलाशयात एक, अशी सुरक्षा गार्डची पदे भरण्यात आली आहेत. प्रकल्प आणि साहित्य सुरक्षेची जबाबदारी या सुरक्षा गार्डच्या खांद्यावर देण्यात आली आहे; परंतु प्रकल्प स्थळात भलतेच प्रकार सुरू आहेत. सुरक्षा गार्ड तैनात असताना प्रकल्प स्थळात साहित्य चोरीचे प्रमाण वाढले आहे. प्रकल्पाला सुरक्षित करण्यासाठी लोखंडी जाळीचे कुंपण करण्यात आले आहे. जाळीला लोखंडी रॉडने आधार देण्यात आलेला आहे. चोरट्यांनी लोखंडी रॉड कापून नेले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाची सुरक्षा करण्यासाठी गार्ड नियुक्त करण्यात आले असले तरी सेवेला दांडी मारण्यात येत असल्याने साहित्य चोरीचे प्रमाण वाढले आहे. प्रकल्पाचे सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या लोखंडी जाळीचे रॉड चोरट्यांनी लंपास केले आहेत. यामुळे प्रकल्पाची सुरक्षा ऐरणीवर आल्याचे चित्र निदर्शनास येत आहे. महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प या ना त्या कारणाने चर्चेत आहे. बावणथडी नदीवर साकारण्यात आलेल्या सिहोरा परिसरातील सोंड्याटोला सिंचन प्रकल्प सुरक्षा गार्डच्या अफलातून कारभाराने पुन्हा चर्चेत आला आहे. ११० कोटी खर्चाच्या प्रकल्पाची सुरक्षा करण्यासाठी प्रकल्प स्थळात नऊ सुरक्षा गार्डची पदे वाढविण्यात आली आहेत. या वर्षात यात दोन पदे कपात करण्यात आली आहेत. एकूण सात पदे भरण्यात आली आहेत. तुमसरच्या कंत्राटदाराला पदे भरतीचे कंत्राट देण्यात आले आहे. सोंड्याटोला प्रकल्पात सहा आणि चांदपूर जलाशयात एक, अशी सुरक्षा गार्डची पदे भरण्यात आली आहेत. प्रकल्प आणि साहित्य सुरक्षेची जबाबदारी या सुरक्षा गार्डच्या खांद्यावर देण्यात आली आहे; परंतु प्रकल्प स्थळात भलतेच प्रकार सुरू आहेत. सुरक्षा गार्ड तैनात असताना प्रकल्प स्थळात साहित्य चोरीचे प्रमाण वाढले आहे. प्रकल्पाला सुरक्षित करण्यासाठी लोखंडी जाळीचे कुंपण करण्यात आले आहे. जाळीला लोखंडी रॉडने आधार देण्यात आलेला आहे. चोरट्यांनी लोखंडी रॉड कापून नेले आहेत. सुरक्षा गार्डच्या डोळ्यादेखत प्रकल्प स्थळात चोरीचा प्रकार घडत असताना सुरक्षा गार्ड शांत बसले आहेत. प्रकल्प स्थळातील धरण मार्गावरून महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यातील नागरिकांची वर्दळ सुरू राहत आहे. प्रकल्प स्थळात चोऱ्या होत असताना पोलिसांत मात्र तक्रार देण्याचे टाळण्यात येत आहे. निविदा कंत्राटदाराच्या दुर्लक्षितपणामुळे सोंड्याटोला प्रकल्पात आलबेल प्रकार सुरू आहे.  याकडे संबधित यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याने शंकाकुशंकांना पेव फुटले आहे. वरीष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

सुपरवायझरचे पद समाप्त - सोंड्याटोला सिंचन प्रकल्पात सुरक्षा गार्ड नियुक्त करताना एक पद सुपरवायझरसाठी अनेक वर्षांपासून राखीव करण्यात आले आहे; परंतु यंदा सुरक्षा गार्डची सात पदे भरताना सुपरवायझरचे पद समाप्त करण्यात आले आहे. सुरक्षा गार्डच्या सेवेवर नियंत्रण ठेवणे, सेवेला दांडी मारणाऱ्या गार्डची हकालपट्टी करणे, त्यांची हजेरी घेणे, प्रकल्पात नियमित भेट देणे, सुरक्षा गार्डच्या कामावर लक्ष ठेवणे, अशी अनेक कामे सुपरवायझरची आहेत; परंतु सुपरवायझरचे पद रद्द करण्यात आल्याने नियंत्रण सुटले आहे.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प