शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरमध्ये सादिक व इरफान पोहचवतो घरपोच भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 06:00 IST

मोहन भोयर । लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीने कुणी घराबाहेर पडत नाही. ...

ठळक मुद्देसामाजिक बांधिलकी : कोरोनाच्या सावटात ऑटोरिक्षातून पोहचतात घरोघरी

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीने कुणी घराबाहेर पडत नाही. अशा काळात सामाजिक बांधिलकी जोपासत तुमसर येथील दोन भावंडांनी आॅटोरिक्षातून घरपोच भाजीपाला पोहचविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. सामाजिक अंतर राखत हे दोन भावंडांचे फिरते भाजीपाला दुकान लॉकडाऊनच्या काळात दिलासा देत आहे.साधिक शेर अली आणि इरफान शेर अली अशी या भावंडांची नावे आहेत. स्टेशनटोली परिसरात राहणाऱ्या या भावंडांचा कांदे बटाटे विक्रीचा व्यवसाय आहे. वडिलांसोबत आठवडी बाजारात दुकान लावतात. परंतु २२ मार्चपासून लॉकडाऊनला सुरूवात झाली. नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले. सर्वसामान्य नागरिक व व्यवसायीकांना फटका बसत आहे. घराबाहेर पडले तर पोलिसांचा प्रसाद मिळण्याची भीती आहे.महिला तर घराबाहेरच येत नाही. अशा स्थितीत भाजीपाला मिळणे कठीण झाले. हीच अडचण ओळखून इरफान आणि साधिक या भावंडानी घरपोच भाजीपाला पोहचविणे सुरू केले. भाजी विक्री करताना नागरिकांना तोंडाला मास्क लावण्याचा संदेश देवून एक मिटर अंतर ठेवण्यास सांगतात. साबनाने हात धुवून भाजी विक्री करतात.अशी सुचली आयडियासाधिक व इरफान या भावंडांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. परंतु तो ठप्प झाला. आपण घरपोच भाजीपाला पोहचविला तर आपलाही चरितार्थ चालेल, असे त्यांनी वडील शेरअली यांना सांगितले. त्यांनी परवानगी देतात आॅटोरिक्षाच्या माध्यमातून तुमसर शहर परिसरात आणि ग्रामीण भागात भाजी विकत आहे.

टॅग्स :social workerसमाजसेवकvegetableभाज्या