चुल्हाड (सिहोरा) : ग्रामीण रुग्णालय सिहोरा येथे देण्यात आलेले १०८ क्रमांकाचे तात्काळ सेवेचे रुग्णवाहिका वाहन अन्य आरोग्य सेवेत स्थानांतरीत करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नाने वाहन पुन्हा ग्रामीण रुग्णालयाला मिळणार आहे.सिहोरा परिसरात रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा दिली जात आहेत. नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी दिमतीला आंग्ल दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र, आयुर्वेदिक दवाखाना तथा ग यामीण रुग्णालय आहे. गावात उपकेंद्र आहेत. यामुळेच आरोग्य सेवेसंदर्भात नागरिकांत बोंबाबोंब नाही. परिसरातील पाऊण लाख नागरिकांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी अधिकाऱ्यांचा फौजफाटा आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका आहेत. परंतु सिहोऱ्याच्या ग्रामीण रुग्णालयाला देण्यात आलेले १०८ क्रमांकाचे तात्काळ सेवा उपलब्ध करणारी रुग्णवाहिका अन्य जिल्ह्यात पळविण्यात आली आहे. भंडाऱ्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात असणारे वाहन अपघातग्रस्त झाले असल्याचे कारणावरून सिहोऱ्यात असलेले वाहन परत मागविण्यात आले. यामुळे परिसरात जलद आरोग्य सेवा प्रभावित झाली आहे. नागरिकांना तात्काळ वाहन प्राप्त होत नसल्याने रुग्णांचे आरोग्य आणि उपचार धोक्यात आले आहे. पूरग्रस्त, जंगलव्याप्त तथा आंतरराज्यीय सिमेवर असणाऱ्या या परिसरातील वाहन पळविण्यात आल्याने नागरिकांत संताप निर्माण झालेला आहे. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका प्राप्त करण्यासाठी नागरिकांचा लोकप्रतिनिधी यांच्यावर वाढता दबाव आहे.४७ गावांतील नागरिकांना आरोग्य सेवा देणारे वाहनाचे वारे न्यारे करण्यात आल्याने पंचायत समिती सभापती कलाम शेख यांनी पुणे येथील आरोग्य विभागात संपर्क साधून माहिती जाणून घेतली आहे. या विभागातील अधिकाऱ्यांनी ठोस उत्तरे दिली नाही. यामुळे ग्रामीण रुग्णालयाचे हक्काचे वाहन अन्य आरोग्य केंद्रात सेवेसाठी उपयोग करण्यात येत असल्याची खळबळजनक माहिती मिळाली आहे. मध्यंतरी वाशीम जिल्ह्यात ही रुग्णवाहिका असल्याचे माुहती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली होती. परंतु जिल्हा आरोग्य विभागाने या वृत्ताची पुष्टी केली नाही. यामुळे राज्यात ही रुग्णवाहिका बेपत्ता झाल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला आहे. सदर रुग्णवाहिका सिहोऱ्याच्या ग्रामीण रुग्णालयाला येत्या १५ दिवसात उपलब्ध केले जाणार असल्याची हमी आरोग्य विभागाच् या वरिष् ठ अधिकाऱ्यांनी सभापती कलाम शेख यांना दिली असल्याने नागरिकांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. या चर्चेवर ुरुग्णालयात कार्यरत कर्मचाऱ्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. परंतु संबंधित १०८ क्रमांकाचे वाहन कुठे आहेत. या संदर्भात कुणी वरिष्ठ अधिकारी सांगण्याच्या स्थितीत नाहीत. यामुळे रुग्णवाहिका प्राप्त होणा किंवा नाही हे सांगणे कठीणच आहे. (वार्ताहर)
ग्रामीण रुग्णालयाला वाहन मिळणार
By admin | Updated: March 6, 2015 01:01 IST