शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

संगम बेटावर रनिंग हातभट्टी उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 05:00 IST

संगम बेटावर मोठ्या प्रमाणात अवैध दारू गाळली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बोटीच्या साहाय्याने तेथे पोहोचून धाड मारली. त्यावेळी हातभट्टीची दारू गाळणे सुरू होते. तीन चुलींवर लोखंडी ड्रम मांडून दारू गाळली जात होती. यावेळी २,७४० किलो मोहपास, ९० मातीचे मटके, ३० प्लास्टीक ड्रम, तीन घमेले, २,००० किलो जळाऊ लाकडे, दारूने भरलेले रबरी ट्युब आदी साहित्य जप्त करण्यात आले. 

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वैनगंगा नदीपात्रातील संगम बेटावर सुरू असलेल्या हातभट्टीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सायंकाळी धाड टाकली. सहसा कुणीही पोहोचणार नाही, अशा ठिकाणी पोलिसांनी पोहोचून ३ लाख ८३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रवींद्र श्रावण मेश्राम (५२), देवराम कृष्णाजी बोरसरे (३७), संजय बाबुराव खंगार (३७) तिघे राहणार तिड्डी, राकेश बाबुलाल मेश्राम (३०) रा.संगम पुनर्वसन अशी दारू गाळणाऱ्यांची नावे असून, त्यांच्याविरुद्ध जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगम बेटावर मोठ्या प्रमाणात अवैध दारू गाळली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बोटीच्या साहाय्याने तेथे पोहोचून धाड मारली. त्यावेळी हातभट्टीची दारू गाळणे सुरू होते. तीन चुलींवर लोखंडी ड्रम मांडून दारू गाळली जात होती. यावेळी २,७४० किलो मोहपास, ९० मातीचे मटके, ३० प्लास्टीक ड्रम, तीन घमेले, २,००० किलो जळाऊ लाकडे, दारूने भरलेले रबरी ट्युब आदी साहित्य जप्त करण्यात आले. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, उपनिरीक्षक रवींद्र रेवतकर, विवेक राऊत, सहायक फौजदार धर्मेंद्र बोरकर, सुधीर मडामे, हवालदार कैलाश पटोले, किशोर मेश्राम, नितीन महाजन, गौतम राऊत, श्रीकांत मस्के, प्रफुल्ल कठाणे, स्नेहल गजभिये, नंदकिशोर मारबते, सचिन देशमुख, मंगेश मालोदे यांनी केली. 

खासगी बोटीने पोलीस पोहोचले बेटावर- वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या बेटावर पोहोचणे कठीण झाले आहे. याचाच फायदा घेत, येथे दारू गाळली जात होती. पोलिसांनी येथील रनिंग हातभट्टीवर धाड मारण्यासाठी खासगी बोटी घेतल्या. लाइफ जॅकेट घालून पोलीस बेटावर पोहोचले. त्या ठिकाणी असलेल्या झुडुपी वनस्पतीच्या आधारे दारू गाळली जात होती. या धाडीमुळे दारू गाळणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस