शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरातील ड्राय क्लिनर्समधून ५ कोटींचे घबाड जप्त; ॲक्सिस बँकेचा व्यवस्थापक चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: February 4, 2025 21:14 IST

तुमसर मधील ॲक्सिस बँकेच्या व्यवस्थापकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

भंडारा : तुमसर शहरातील इंदीरानगर परिसरात असलेल्या राजकमल ड्राय क्लिनर्स या दुकानातून पोलिसांनी ५ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली आहे. या प्रकरणी तुमसर मधील ॲक्सिस बँकेच्या व्यवस्थापकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक नूरूल हसन यांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरून दुपारी स्थानिक गुन्हे शाखा आणि दहशतवाद विरोधी पथकाने दुपारी २ वाजता अचानकपणे या दुकानात धाड घातली. यावेळी दुकानात मोठ्या प्रमाणावर रक्कम असल्याचे लक्षात आले. पथकाोणे ही रक्कम मोजली असता ती ५ कोटी रुपये भरली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुण्या एका व्यक्तीच्या सांगण्यावरून तुमसरमधील ॲक्सिस बँकेच्या व्यवस्थापकाने ही रक्कम बँकेतून अनधिकृतपणे काढली होती. ‘त्या’ व्यक्तीला ही रक्कम दिल्यावर या बदल्यात त्याला ६ कोटी रुपये देण्याचे ठरले होते. त्यानंतर मिळालेल्या रकमेतून ५ कोटी बँकेत जमा करून त्याला एक कोटी रुपयांचे कमिशन मिळणार होते. मात्र, पोलिसांना गोपनिय माहिती मिळाले, आणि हा प्रकार उघडकीस आला.

जिल्हा पोलिस अधीक्षक नूरूल हसन यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून त्यांनी या मोहिमेला दिशा दिली. ही रक्कम जमा करून पोलिसात आणण्यात आली आहे. ॲक्सिस बँकेचे रिजनल व्यवस्थापक तसेच रिझर्व्ह बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. ते काही वेळात तुमसरमध्ये पोहचत आहेत. ही रक्कम कुठे जाणार होती, कशासाठी दिली जाणार होती. तो मध्यस्त कोण या संदर्भात पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस