भंडारा : ‘सीबीएसई’च्या (सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन) दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. यामध्ये भंडारा येथील रॉयल पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी स्वाती पटले हिने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तिला ९७.६० टक्के गुण मिळाले आहेत. त्यानंतर रॉयल पब्लिक स्कूलचा विद्यार्थी तेजस भोंगाडे हा जिल्ह्यातून द्वितीय आला असून त्याला ९७.२० टक्के गुण मिळाले आहेत. पाच शाळांचा निकाल १०० टक्के भंडारा जिल्ह्यात ‘सीबीएसई’ पॅटर्नच्या ९ शाळा असून भंडारा शहरात ६ शाळा आहेत. यापैकी महर्षी विद्या मंदिर भंडारा, महर्षी विद्या मंदिर तुमसर, रॉयल पब्लिक स्कूल भंडारा, स्प्रिंग डेल स्कूल भंडारा आणि सेंट पिटर्स या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. भंडारा येथील महर्षी विद्या मंदिरचा विद्यार्थी सक्सेस शेंडे याने जिल्ह्यातून तिसरा क्रमांक पटकाविला असून त्याला ९६.८० टक्के गुण मिळाले आहेत. याशिवाय महर्षी विद्या मंदिरचे ४१ विद्यार्थी हे गुणवत्ता यादीत आले आहे. रॉयल पब्लिक स्कूलचे १८ विद्यार्थी, सेंट पिटर्सचे १८ विद्यार्थी, जवाहरनगर केंद्रीय विद्यालयाचे १६ विद्यार्थी, सनफ्लॅग स्कूलचे ११ विद्यार्थी, स्प्रिंग डेल स्कूलचे ११ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. यात अभिषेक ठवकर ९६.२ टक्के, संकेत पारधी ९६ टक्के, अपूर्वा राहूलकर ९५ टक्के, क्षितिज सिंगनजुडे ९४.६ टक्के, रोहित वलथरे ९३.२ टक्के, तर महर्षि विद्या मंदिर बेला येथील विद्यार्थी ग्रिनीता पुरूषार्थी ९६.४० टक्के, तुषार लांजेवार ९६.४० टक्के, प्रणय समरीत ९६.२० टक्के, सायली चेटुले, धनश्री रामटेके ९६ टक्के, पारुल उके, प्रतिक्षा काशिवार ९५.४० टक्के, तर अनिमेश कक्कड याला ९५ टक्के गुण मिळाले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. (शहर प्रतिनिधी)
रॉयल पब्लिकची स्वाती पटले जिल्ह्यात अव्वल
By admin | Updated: May 20, 2014 23:29 IST