शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

साकोलीत बोगस कामगार वेलफेअर संघटनांकडून रोहयो मजुरांची लूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 15:39 IST

Bhandara : रोजगार हमीच्या मजुरांनी प्रलोभनांना बळी पडू नये

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : सध्या साकोली तालुक्यात बोगस कामगार वेल्फेअर संघटना उभारून तालुक्यातील गावागावात या संघटनेकडून कमिशन एजंट नेमून विविध सोयीच्या नावाखाली रजिस्ट्रेशन फी नोंदणी फी घेऊन कुठलीही पावती न देता स्थानिक रोजगार हमी मजुरांची मोठ्या प्रमाणावर लूट होत असून या लूट मारीत कोण सहभागी आहेत, याबाबत पोलिसांनी चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

एका कार्यकर्त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, भंडाऱ्यातील एका इसमाने रोजगार हमी कामगारांसाठी एक वेल्फेअर संघटना स्थापन केली आहे. साकोली तालुक्यातील प्रत्येक गावात या संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष व गाव अध्यक्ष अशी पदे निर्माण करून दलालामार्फत रोजगार हमी वरील मजुरांना वेगवेगळ्या योजनांचे प्रलोभन देऊन याकरिता नोंदणी फीस आकारली जाते.

२०० ते ५०० रुपये याकरिता घेण्यात येतात. नोंदणी फीस दिल्यानंतर संघटनेच्या वतीने शंभर दिवस रोजगार हमीचे काम निश्चित मिळेल, तसेच बस प्रवाससुद्धा मोफत राहील जीवन विमा मोफत राहील व प्रत्येकाला सातशे रुपये रोजी याप्रमाणे मजुरी देण्यात येईल, असे आश्वासन या बोगस कामगार वेल्फेअर संघटनेच्या स्वयंघोषित पदाधिकाऱ्यामार्फत देण्यात येत आहे.

असाच प्रकार तालुक्यातील लवारी येथे घडल्यानंतर लवारी उमरी येथील सरपंच नरेश नगरीकर यांनी या घटनेची माहिती खंड विकास अधिकारी साकोली यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी गावात दवंडी पिटवून रोजगार हमीच्या मजुरांना सावध केले व कुणीही अशा प्रलोभनांना बळी पडू नये, असे रोहयोच्या कामावरील मजुरांना कळविले.

"मजुरांकडून विषय कळल्यानंतर खंडविकास अधिकारी यांना ही माहिती दिली. असे प्रकार बोगस असून स्थानिक मजुरांनी जागृत राहून प्रलोभनांना बळी पडू नये व पैशाचे व्यवहार करू नये, असे त्यांनी कळविले आहे."- नरेश नगरीकर, सरपंच

टॅग्स :government schemeसरकारी योजनाsakoli-acसाकोलीbhandara-acभंडारा