शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदी केंद्रात शेतकऱ्यांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 05:00 IST

यंदाच्या खरिपात धान खरेदीकरिता शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र उशिरा सुरु केली आहेत. तथापि, शेतकऱ्यांनी मागील दोन महिन्यांपूर्वी धानपिकाची कापणी व मळणी केली आहे, तर उर्वरित काही क्षेत्रातील धानपिकाच्या मळणीला वेग आला आहे. मात्र शासनाने शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र उशिरा सुरु केल्याने धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : यंदाच्या खरिपात धान खरेदीकरिता शासनाने प्रतिपोती चाळीस किलो धान खरेदीचे निर्देश खरेदी केंद्र चालक संस्थांना दिले आहेत. मात्र, शासनाच्या या निर्देशाकडे दुर्लक्ष करुन केंद्रचालक संस्थांनी प्रतिपोती ४० किलो धानाऐवजी ४२ किलो धान खरेदी केले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांतून केला जात आहे. त्यामुळे प्रतिक्विंटल ५ किलो अधिकचे धान खरेदी केले जात असल्याने शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप केला जात आहे.यंदाच्या खरिपात धान खरेदीकरिता शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र उशिरा सुरु केली आहेत. तथापि, शेतकऱ्यांनी मागील दोन महिन्यांपूर्वी धानपिकाची कापणी व मळणी केली आहे, तर उर्वरित काही क्षेत्रातील धानपिकाच्या मळणीला वेग आला आहे. मात्र शासनाने शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र उशिरा सुरु केल्याने धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे. दरम्यान, या गर्दीचा गैरफायदा घेत धान खरेदी केंद्रचालकांनी प्रतिक्विंटल ५ किलो अधिकचे धान खरेदी केले जात असल्याचा आरोप धान उत्पादक शेतकऱ्यांतून केला जात आहे.यंदाच्या खरिपात तालुक्यात एकूण २६ हजार ७० हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात आली होती. मात्र, लागवडीखालील धान पिकावर विविध कीड रोगांचा प्रकोप झाल्याने पीक उत्पादनात घट झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. तथापि, तालुका कृषी विभागाने तालुक्यात प्रतिहेक्टर केवळ २७ क्विंटल धान पिकाचे उत्पादन होणार असल्याची माहिती दिल्याने उत्पादनात घट झाल्याचे समर्थन केले आहे. त्यामुळे तालुक्यातील हजारो धान उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असल्याची चर्चा केली जात आहे. तथापी, शासन निर्देशांचे उल्लंघन करून शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्र चालकांकडून नियमबाह्यरित्या प्रतिक्विंटल ५ किलो अधिकचे धान खरेदी केल्याचा आरोप केला जात आहे.  कीड रोगांच्या प्रकोपाने पीक उत्पादनात घट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असल्याचा फायदा घेत केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांचे प्रतिक्विंटल ५ किलो धान खरेदी करून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. याप्रकरणी शासन प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन धान खरेदी केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबविण्याकरिता आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी धान उत्पादक शेतकऱ्यांतून केली जात आहे.

जबाबदारी कुणाची

- जिल्ह्याला धानाचे कोठार म्हटले जाते. आधिक शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या दरानुसार धानाची खरेदी केली जात नाही. उघड्यावर कोट्यवधींचे धान पडले असते. उचल करण्यासाठी विविध नियम लावले जातात. अस्मानी संकट कोसळले तरी त्याचा फटका बळीराजालाच सहन करावा लागतो. धान ओले झाले म्हणून पाखर झालेल्या धानाच्या नावापोटी किंमत कमी दिली जाते. दोन्ही बाजूने बळीराजा भरडला जात असताना शासनाची जबाबदारी काय, असा प्रश्न बळीराजा विचारीत असतो. क्विंटलमागे तीन हजार रुपयांचा भाव द्यावा, अशी बळीराजाची मागणी असतानाही त्याकडे नाकाडोळा केला जातो. ही मागणी पूर्ण झाल्यास बोनसचीही गरज नाही.

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड