शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पालांदुरातील रस्त्यांसाठी हवा ३.९० कोटी रुपयांचा बुस्टरडोस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 15:48 IST

निधीची प्रतीक्षा : बायपास, मुख्य रस्त्याच्या गटारांची दुरवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : तालुक्यानंतरचे महत्त्वाचे खेडेगाव म्हणून ओळखले जाणारे पालांदूर हे गाव शासनाकडून विकासासाठी निधी न मिळाल्यामुळे अडचणीत सापडले आहे. येथे मुख्य समस्या रहदारीशी संबंधित असून, बायपाससाठी ३.९० कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. ही मागणी जिल्हा विकास निधीअंतर्गत करूनही दुर्लक्षित आहे.

पालांदूरचा मुख्य रस्ता तसेच त्याला जोडणाऱ्या गावातील रस्ते खूपच खराब अवस्थेत आहेत. पालांदूरला जोडणाऱ्या इतर ग्रामीण रस्त्यांवर चिखल जमा झालेले असून काळजी घेण्यात अडचणी आहेत. निवडणुकीदरम्यान जाहीरनाम्यांमध्ये दिलेल्या वचनांची पूर्तता करण्याची मागणी नागरिकांकडून होत असताना, शासनाकडून निधीच्या तरतकाचे कारण दाखवले जात आहे मुख्य रस्त्याच्या गटारांची अवस्था फारच बिघडलेली असून गावातून जाणारा मुख्य रस्ता सिमेंट काँक्रीटचा असला तरी निधीअभावी नालींची निर्मिती नाही, त्यामुळे वळणावर अपघात होण्याचा धोका दररोज निर्माण होत आहे. पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून मिळालेला निधी अपुरा असल्यामुळे गटारांची उंची वाढवता आली नाही. 

ग्रामपंचायतीचे उत्पन्न कमी असल्यामुळे नालींची दुरुस्ती शक्य नाही. पालांदूरसाठी बायपास महत्त्वाचा आहे. वाढत्या रहदारीला न्याय देण्यासाठी पालांदूरच्या बाहेरून जात असलेला आणि संजयनगरात थेट जोडणारा बायपास अनेक वर्षे प्रतीक्षेत आहे. पालांदूरमधील दुसरा रस्तासुद्धा अत्यंत खराब अवस्थेत असून खड्ड्यांनी भरलेल्या या रस्त्यालादेखील दुरुस्तीची गरज आहे. संताजी सभागृहापासून सार्वजनिक हनुमान देवस्थानापर्यंत रस्त्याचे बांधकाम होणे आवश्यक आहे. त्याचा प्रस्ताव बांधकाम विभागाकडे पोहोचला आहे; पण निधीअभावी काम झालेले नाही.

पालांदूरच्या जोड रस्त्यांचीही दुरवस्थाभागातील रस्ते फुटले आहेत. पालांदूरला जोडणाऱ्या दैनंदिन व्यवहारांसाठी महत्त्वाच्या रस्त्यांची अवस्था अत्यंत गंभीर आहे. पालांदूर ते गोंदी-देवरी, पालांदूर ते पहाडी, पालांदूर-पाथरी नाल्यावर पूल प्रतीक्षेत आहे, तसेच पालांदूर-ढिवरखेडा नाल्यावर पूल आणि पालांदूर-निमगाव नाल्यावर पूलदेखील बांधणीसाठी प्रतीक्षेत आहेत. पालांदूरमधील अंतर्गत रस्ते चिखलमय आहेत. जलजीवन सेवेचा निधी प्राप्त झाला असूनही तो अपुरावा आहे.

पाणीपुरवठा योजनाही अर्धवटअपुऱ्या निधीमुळे पाणीपुरवठा योजनाही अर्धवट राहिल्या आहेत. चांगली स्थिती असलेले रस्ते फुटपाथ केले गेले असून, कंत्राटदारांचे बिल थकले असल्यामुळे कामे थांबून आहेत. निधीचा अभाव असल्याने काम पुढे कसे होईल हा प्रश्न सर्वांच्या समोर आहे.

टॅग्स :bhandara-acभंडाराroad transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा