शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

रेती वाहतुकीने रस्ते जीवघेणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2016 01:30 IST

जिल्ह्यात रेतीचा अवैध व्यवसाय जोमात सुरू असताना परवा रात्री एका ट्रक चालकाचा दुदैवी मृत्यू झाला.

जिल्ह्यात ४० रेतीघाट सुरू : रेतीचा अवैध गोरखधंदाभंडारा : जिल्ह्यात रेतीचा अवैध व्यवसाय जोमात सुरू असताना परवा रात्री एका ट्रक चालकाचा दुदैवी मृत्यू झाला. एरव्ही रेतीच्या अवैध वाहतुकीमुळे सामान्यांचा जीव जात असताना कालच्या प्रकरणाने पुन्हा एकदा या मुद्याला रंग चढला आहे. गेलेल्या जीव परत येऊ शकत नाही. मात्र या रेतीच्या अवैध व्यवसायामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची होणारी दयनिय अवस्था व त्यामुळे घडणारे अपघात सामान्यांची परीक्षाच घेत आहे. भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीसह तिच्या उपनद्यांचे विस्तारीत पात्र आहे. याच नदीपात्रातून दरवर्षी कोट्यवधी रूपयांचा रेतीचा उपसा केला जातो. नियमात नसला तरी २४ तास चालणारा हा ‘बिझनेस’ कधीकाळी अंगावरही येतो. यात महसूल प्रशासन व पोलीस विभागांचे संगनमत असते. कुणी चिरिमिरी देऊन सुटतात तर कुणी पळून जाण्यात यशस्वी ठरतात. मात्र रेतीचा अवैध गोरखधंदा बंद झालेला नाही.जिल्ह्यात सद्यस्थितीत ४६ रेतीघाट उपसा करण्याच्या स्थितीत आहे. यापैकी २०१५-१६ मध्ये झालेल्या लिलावादरम्यान आतापर्यंत सहा रेतीघाटांचे दिलेल्या मंजुरीप्रमाणे रेतीचा उपसा पूर्ण झालेला आहे. १५ रेतीघाटांचा उपसा अजुनही सुरू आहे. तर अन्य २५ रेतीघाट नियमितपणे कार्यरत आहे. वैनगंगा नदीपात्रात पाणी असेल तिथून वाळूचे खणन बंद आहे. जिथे पाणी वाहते व संथगती आहे अथवा पात्र कोरडे आहे, अशा ठिकाणाहून रेतीची वाहतुक सुरू आहे. ज्या नदीपात्रातून नियमाप्रमाणे रेतीचा उपसा केला जातो तिथे वजनकाटा नसल्याने कधी ओव्हरलोडेड ट्रक किंवा ट्रॅक्टर नदीपात्रातून बाहेर निघतो. त्यावर प्रशासन जलदगतीने कारवाई करते. परंतु ओव्हरलोडेड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था होत आहे. सातही तालुक्यातील ज्या नदीपात्रातून रेतीची वाहतूक सुरू आहे त्या घाटाजवळील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. रस्त्यावर जीवघेणे खड्डे निर्माण झाले असून अपघातालाही आमंत्रण मिळत आहे. सर्वात जास्त वाईट स्थिती म्हणजे, ज्या घाटातून रेतीचा उपसा करून वाहन गावातून जात असल्यास तेथील रस्ते दयनीय झाले आहे. रेतीच्या अवैध वाहतुकीचा फटका अनेकांच्या जीवावर बेतला आहे. दुसरीकडे जे रस्ते जिल्हा मार्ग, राज्य मार्ग अथवा राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत येतात त्या रस्त्यांच्या डागडुजीवरही शासनाचा कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च केला जातो. यात संबंधिताना पुन्हा वारेमाप पैसा मिळतो. मागील वर्षभरात अवैध वाहतुकीमुळे लहान मोठे अपघात घडले आहे. (प्रतिनिधी)ट्रक, टिप्परची वर्दळ थंडावलीविरली (बु.) : ट्रक चालक दिलीप रोहणकर यांच्या अपघात प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी हे लाखांदुरला येणार असल्यामुळे धास्तावलेल्या रेतीघाट कंत्राटदारांनी गुरूवारला रेतीघाट बंद ठेवले होते. परिणामी विरली-पवनी मार्गावर अविरत चालणारी रेतीच्या टिप्परची वर्दळ थंडावली. मंगळवारला रात्री लाखांदूरचे नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड हे ओव्हरलोड रेती भरलेल्या टिप्परचा पाठलाग करीत असताना घाबरलेल्या चालकाने धावत्या ट्रकमधून उडी घेतली. यावेळी ट्रकच्या मागच्या चाकात दबून रोहणकर यांचा जागीच मृत्यू झाला होता. हा अपघात की घातपात याविषयी चर्चा आहेत. या अपघाताच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी येणार असल्यामुळे रेतीघाट कंत्राटदारांनी लाखांदूर तालुक्यातील ईटान, नांदेड, मोहरणा हे रेतीघाट बंद ठेवले. त्यामुळे अहोरात्र चालणारी रेतीच्या टिप्परची वर्दळ आज थांबलेली दिसून आली. (वार्ताहर)