शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

रेंगेपारला भूस्खलनाचा धोका!

By admin | Updated: July 15, 2016 00:44 IST

मागील दहा वर्षांपासून रेंगेपार येथे वैनगंगा नदी झपाट्याने गावाच्या दिशेने वाढत आहे. सध्या वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे.

मोहन भोयर तुमसर मागील दहा वर्षांपासून रेंगेपार येथे वैनगंगा नदी झपाट्याने गावाच्या दिशेने वाढत आहे. सध्या वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. येथील १२ घरांना भुस्खलनाची भिती आहे. नदीपात्र व या घरांचे अंतर दोन ते तीन फूट एवढेच शिल्लक आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. १२ घरे वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमसरपासून १५ कि़मी. अंतरावर रेंगेपार हे १३०० लोकवस्तीचे गाव वैनगंगा नदी काठावर वसले आहे. शेतकरी तथा शेतमजूरांचे या गावात वास्तव्य आहे. प्रचंड रेती उपश्यामुळे नदीचा प्रवाह येथे बदलला. गावाच्या दिशेने मागील १० वर्षात वैनगंगा झपाट्याने येऊ लागली. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी नदी पात्रात गिळंकृत झाल्या. मागील दोन ते तीन वर्षापासून नदीकाठावर येथील १२ घरे आली आहेत. या घरांना पुराचा धोका आहे. त्यांच्याजवळ येथे राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. जीव धोक्यात घालून त्यांना येथे राहावे लागत आहे. येथे विजयकलाबाई भुरे, अशोक उके, आनंदराव सोनेवाने, प्रमानंद ठाकरे, अंबर शेंडे, रामभाऊ नागपुरे, ब्रिजलाल मोरांडे, बाबुलाल मोरांडे, गुलाब कावळे, कला शेंडे, हंसराज माहुले, कंठीराम नागपुरे यांचे वास्तव्य आहे. सन २००७-०८ मध्ये सर्वप्रथम पं.स. सदस्य हिरालाल नागपुरे यांनी आंदोलन उभारले होते. तेव्हा हे गाव प्रकाशझोतात आले. तत्कालीन आमदार नाना पटोले यांनी स्वातंत्र्यदिनी जलसमाधी घेण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. पुढे पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. राज्याच्या विधीमंडळात प्रश्न चर्चेला आला. येथे बाधीतांना शासनाने भुखंड दिले, परंतु भुखंडावर घरे बांधून दिली नाही. भूखंड मिळून पाच वर्षे झाली, परंतु आर्थिक स्थिती बेताची असल्याने या कुटूंबांनी अजुनपर्यंत घरे बांधली नाही. वैनगंगा दुथडी भरून वाहत आहे. हळूहळू भूस्खलनाची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. बाजूला सिलेगावकडे जाणारा रस्त्याहून वाहतुकही सुरू आहे. भूस्खलनात ही घरे नदी पात्रात गडप होण्याचा धोका आहे. रेंगेपार येथील जिल्हा परिषदेची शाळा सुद्धा नदी पात्राजवळच आहे. कुतुहल म्हणून नदीकडे जाण्याचा मोह विद्यार्थ्यांना निश्चितच होतो. येथे शिक्षकांना विद्यार्थ्यांकडे सुट्टीत लक्ष द्यावे लागते. लोकप्रतिनिधी तथा प्रशासनाने येथे प्रत्यक्ष जावून पाहणी करण्याची गरज आहे. एक विशेष बाब म्हणून येथे १२ कुटूंबाना घरे बांधून देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची गरज आहे. तात्पुरता निवाऱ्याची व्यवस्था येथे प्रशासनाने करण्याची गरज आहे. शासन व प्रशासनाकडे अनेकदा निवेदने व विनंती करण्यात आली, परंतु त्याचा काहीच फायदा होतानी दिसत नाही. येणाऱ्या पुढील काळात जनआंदोलन उभारावे लागेल. -हिरालाल नागपुरे, गटनेता पं.स. तुमसर.