शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा धोका वाढला; 700 गावांना कोरोनाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात पहिल्या लाटेत सर्वाधिक रुग्ण शहरी भागात आढळून येत होते. त्यामुळे ग्रामीण भागात निश्चिंत होता; परंतु अलीकडे शहरांपेक्षा ग्रामीण भागातच रुग्णांची संख्या वाढायला लागली आहे. भंडारा तालुक्यातील १५८ गावांपैकी तब्बल १५६ गावांमध्ये सद्य:स्थितीत कोरोनाचे रुग्ण आहेत. मोहाडी तालुक्यातील ९९ गावांपैकी ९२ गावांमध्ये कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

ठळक मुद्देभंडारा शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात आरोग्य सुविधा कमी

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा विळखा ग्रामीण भागाला बसला असून गावागावांत आणि घराघरांत कोरोनाचे रुग्ण आहेत. जिल्ह्यातील काही मोजकी गावे सोडली तर तब्बल ७०२ गावांमध्ये सद्य:स्थितीत कोरोना रुग्ण आहेत. पुरेशा सुविधांअभावी ग्रामीण जनता भयभीत झाली आहे.भंडारा जिल्ह्यात पहिल्या लाटेत सर्वाधिक रुग्ण शहरी भागात आढळून येत होते. त्यामुळे ग्रामीण भागात निश्चिंत होता; परंतु अलीकडे शहरांपेक्षा ग्रामीण भागातच रुग्णांची संख्या वाढायला लागली आहे. भंडारा तालुक्यातील १५८ गावांपैकी तब्बल १५६ गावांमध्ये सद्य:स्थितीत कोरोनाचे रुग्ण आहेत. मोहाडी तालुक्यातील ९९ गावांपैकी ९२ गावांमध्ये कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तुमसर तालुक्यातील १३४, पवनी तालुक्यातील १३३, लाखनी तालुक्यातील ९४, साकोली तालुक्यातील ९६ आणि लाखांदूर तालुक्यातील ८९ गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत. ग्रामीण भागात आधीच आरोग्य सुविधांचा अभाव आहे. त्यात रुग्णसंख्या वाढत आहे. ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना भंडारा या जिल्ह्याच्या ठिकाणी धाव घ्यावी लागते. आरोग्य यंत्रणा रुग्णांना सुविधा देण्यास तोकडी पडत असल्याचे सध्या चित्र आहे. अनेक रुग्णांचे नातेवाईक बेडसाठी भटकंती करीत असल्याचे दिसून येते. बेड मिळाला तर ऑक्सिजन नाही आणि ऑक्सिजन मिळाला तर इंजेक्शन नाही, अशी स्थिती आहे.

ऑक्सिजनसाठी लागतात रांगागत काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना ऑक्सिजन सिलिंडर मिळविण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागते. मोहाडी, लाखनी आणि लाखांदूर येथे तर ऑक्सिजन बेडची सुविधाच नाही. त्यामुळे लाखांदूरच्या रुग्णाला पवनी किंवा साकोलीकडे धाव घ्यावी लागते. मोहाडीतील रुग्ण थेट भंडारा गाठतात. लाखनी येथे असलेले १० सिलिंडर भंडारा येथे नेण्यात आले. त्यामुळे लाखनी येथे ऑक्सिजनची सुविधा नाही. 

ऑक्सिजनअभावी मृत्यू नाही पण पुरवठा अपुरा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी ऑक्सिजनअभावी कुणाचाही जिल्ह्यात मृत्यू झाल्याची नोंद नाही. अत्यवस्थ रुग्णांना शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिला जातो. जिल्ह्यात ६२० ऑक्सिजन बेड असून त्यात शासकीय रुग्णालयांमध्ये २५५ आणि खासगी रुग्णालयात ३६५ बेडचा समावेश आहे. तर १३० व्हेंटिलेटर आहेत. रुग्णांना ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा केला जातो. पुरेसा ऑक्सिजन साठा मिळविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला साकडे घातले असून लवकरच वाढीव ऑक्सिजन सिलिंडर साठा उपलब्ध होणार आहे.

लाखनी, लाखांदूर, मोहाडीत ऑक्सिजन बेड नाही जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढत असला तरी सातपैकी तीन तालुक्यांत ऑक्सिजन बेडची सुविधा नाही. मोहाडी, लाखनी आणि लाखांदूर येथे ऑक्सिजन बेडची सुविधा नाही. मोहाडी येथे तर साधे कोविड केअर सेंटरही नाही. त्यामुळे या रुग्णांना जिल्हा रुग्णालयात धाव घ्यावी लागते.

जिल्हा आरोग्य यंत्रणा कोरोना संसर्गाच्या निर्मूलनासाठी प्रभावी उपाययोजना करीत आहेत. ग्रामीण आरोग्य यंत्रणेलाही अपडेट केले जात आहे. सर्व उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्य उपकेंद्रातही अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत रुग्ण वाढत असले तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. लसीकरणाचे कामही वेगाने सुरु आहे. -डाॅ.प्रशांत उईके, जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू