मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : डोंगरी येथील मॉईल खाण परिसरात कंत्राटदाराने तीन ठिकाणी ७०० ते ८०० ब्रास रेती साठा साठवून ठेवला आहे. याप्रकरणी तुमसर तहसीलदारांनी मंडळ अधिकाºयांना गौण खनिज संबंधाने रेती साठ्याचा मोका पंचनामा सादर करण्याचे पत्र दिले असून मॉईल प्रशासनाला ठेकेदारांची माहिती देऊन ठेकेदारांना सूचित करण्याचे पत्र दिले आहे.डोंगरी येथे मॉईलच्या खाणीत रेतीचा साठा आहे. दि. १ सप्टेंबर रोजी तहसीलदारांनी मॉईलला भेट दिली होती. त्या अनुषंगाने तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांनी नाकाडोंगरीचे मंडळ अधिकाºयांना रेती साठ्याचा मोका पंचनामा सादर करण्याचे निर्देश दिले आहे. मॉईल परिसरात मॅग्नीज सफ्लाईड प्लँटजवळ सिमेंट रस्ता बांधकाम सुरु आहे. मंदिराजवळ रेतीचे साठे आहेत. मॉईल कॅम्प सिंडीकेट रस्ता बांधकामाकरिता दोन रेती साठे आहेत. उपलब्ध रेती साठ्याचा मोका पंचनामा सादर करण्याचे निर्देश दिले. सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यासंबंधी मजूर व पर्यवेक्षकांना विचारले असता कंत्राटदार बालाघाट येथील असून पर्यवेक्षकाकडे रेती व गिट्टी गौण खनिज वाहतूक परवाना नव्हते. सदर परवाने कंत्राटदाराकडे असल्याचे पर्यवेक्षकाने सांगितले. कंत्राटदाराची संपूर्ण माहितीचा अहवाल पाठवावे असे पत्रात नमूद असून रेती, गिट्टीचा वाहतूक परवाना अंदाजपत्रकासह तहसील कार्यालयात कंत्राटदाराने सादर करावा असे निर्देश तहसीलदार यांनी दिले आहे. डोंगरी तथा इतर ठिकाणी रेती घाटातून रेती उत्खननाची परवानगी नाही. सध्या घाट बंद आहेत. ही रेती नेमकी कुठली आहे व त्या रेतीची रॉयल्टी आहे का? हा प्रश्न येथे उपस्थित होतो.
महसूल प्रशासनाचे चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:13 IST
डोंगरी येथील मॉईल खाण परिसरात कंत्राटदाराने तीन ठिकाणी ७०० ते ८०० ब्रास रेती साठा साठवून ठेवला आहे.
महसूल प्रशासनाचे चौकशीचे आदेश
ठळक मुद्देरेती साठा प्रकरण : मंडळ अधिकारी, मॉईल प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश