इंद्रपाल कटकवारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात गत आठवड्यात घरापासून बरसलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. परतीच्या पावसाने जवळपास ५० हजार हेक्टरमधील धान पिकांसह अन्य पिकांची नासाडी झाल्याचे शेतकरी सांगत आहे. तर अतिवृष्टी व पूर यामुळे जिल्ह्यातील २७ हजार हेक्टरमधील धानपीक जमीनदोस्त झाले आहे.एकंदरीत ही आकडेवारी जिल्हा कृषी विभागाची असली तरी जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे ३७८ गावांमधील शेत शिवारात धान पिकासह अन्य पिकांचे पिकांना बाधा पोहोचली. यात भंडारा तालुक्यातील ९९, मोहाडी ३५, तुमसर ३६, साकोली ८७, लाखनी १७ तर लाखांदूर तालुक्यातील ३४ गावांचा समावेश आहे. भात, भाजीपाला, सोयाबीन, कापूस, तूर या परतीच्या पावसाने प्रभावित झाली आहेत.भंडारा तालुक्यातील पाच हजार ४६० हेक्टर, मोहाडी तालुक्यातील ४४६२, तुमसर तालुक्यातील तीन हजार ८८७, पवनी ८१३८, साकोली तालुक्यातील २०० तर लाखनी तालुक्यातील ७८, लाखांदूर तालुक्यातील ४५८७, हेक्टर क्षेत्र परतीच्या पावसाने बाधित झाले आहे. विशेष म्हणजे ३३ टक्के पेक्षा कमी नुकसान झालेले क्षेत्र ७०५२ हेक्टर इतके असून ते ३३ टक्के च्यावर २१ हजार ७९५ हेक्टर मधील पिकांना बाधा पोहोचली आहे एकंदरीत जिल्हाभरातील ३८ हजार ९२१ शेतकऱ्यांच्या शेतातील पीके बाधित झाली होती.काय करावे, सुचेनापरतीच्या पावसाने आमच्या तोंडचा घास हिरावला आहे. अजूनपर्यंत कृषी विभागाने पंचनामे केले नाहीत. महसूल प्रशासनाचे अधीकारी व कर्मचारी अजुनही पाहणीसाठी आले नाहीत. परिसरातील शेतकऱ्यांनी हलके धान कापणीला प्रारंभ केला होता. कडपांमध्ये पाणी गेले. काही ठिकाणी धान मातीमोल झाले आहेत. हातचे पीक गेल्याने काय करावे, हे सुचत नाही.-उमराव मस्के, खुटसावरीमदतीची अपेक्षाधान पीक डौलात उभे असताना परतीच्या पावसाने सुमार नुकसान केले आहे. धान मातीत मिसळले आहे. अतिवृष्टी व पुराने कसेबसे सावरले असताना परतीच्या पावसाने आमचे कंबरडे मोडले आहे. पंचनामे झाले नसल्याने मदत मिळणार की नाही असा सवाल आहे. कृषी विभागाने याबाबत पुढाकार घेण्याची गरज आहे, तरच शेतकरऱ्यांना मदतमिळू शकेल.-प्रभू साखरे, दवडीपार.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणीजिल्ह्यातील २६ हजार ८१२ हेक्टर क्षेत्रातील पीके अतिवृष्टी व महापूरामुळे बाधीत झालीत आहेत. नियमानुसार सातही तालुक्यात सर्वेक्षण करण्यात आले. यात ही आकडेवारी समोर आली. निकषानुसार शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. परतीच्या पावसाने नुकसानीची माहिती घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.-मिलिंद लाड,उपिवभागीय कृषी अधीकारी, भंडारा
अन् परतीच्या पावसाने केला शेतकऱ्यांचा घात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 05:00 IST
एकंदरीत ही आकडेवारी जिल्हा कृषी विभागाची असली तरी जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे ३७८ गावांमधील शेत शिवारात धान पिकासह अन्य पिकांचे पिकांना बाधा पोहोचली. यात भंडारा तालुक्यातील ९९, मोहाडी ३५, तुमसर ३६, साकोली ८७, लाखनी १७ तर लाखांदूर तालुक्यातील ३४ गावांचा समावेश आहे. भात, भाजीपाला, सोयाबीन, कापूस, तूर या परतीच्या पावसाने प्रभावित झाली आहेत.
अन् परतीच्या पावसाने केला शेतकऱ्यांचा घात
ठळक मुद्देसदोष नियोजनाचा फटका : जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ७२ टक्के पाणीसाठा