कारवाई प्रभावित होणार : बैठकांचे सत्र सुरू, शेतकऱ्यांवर पुन्हा संकट ओढावणाररंजित चिंचखेडे चुल्हाडसिहोरा परिसरात कोरड्या दुष्काळाचे भयाण चित्र निर्माण झाल्याने शेतीत धान पिकांची रोवणी करण्याकरिता पाणी वाटप करण्यासाठी बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. यातच १२ हजार हेक्टर आर शेतीला पाणी वाटप करण्याची जबाबदारी ३ अमिनावर आल्याने त्यांचीही धाकधुकी वाढली आहे.३८७ हेक्टर आर जागेत विस्तारलेल्या चांदपूर जलाशयाचे पाणी वाटप करण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाच्या यंत्रणेची आहे. या विभागाला रिक्त पदांनी पोखरून काढले आहे. १२ हजार हेक्टर आर शेती ओलीताखाली आणण्यासाठी उजवा आणि डावा कालवा अशी विभागणी स्वतंत्ररित्या करण्यात आली आहे. उजवा कालवा अंतर्गत शाखा अभियंता, शाखा कारकून तथा ३ अमिन यांच्या जागा रिक्त आहे. यामुळे ६ हजार हेक्टर आर शेतीला पाणी वाटपाची जबाबदारी कार्यरत २ अमिनाच्या खांद्यावर आली आहे. याशिवाय डावा कालवा अंतर्गत संपूर्ण प्रशासन सैरवैर झाला आहे. शाखा अभियंता, शाखा कारकून तथा ३ अमिनाच्या जागा रिक्त असल्याने कार्यरत १ अमिनाचा खांदा ६ हजार हेक्टर आर शेतीची धुरा सांभाळणार आहे. पाणी वाटपात शेतकरी अमिन यांनाच जबाबदार धरत असल्याने धाकधुकी वाढली आहे. गेल्या तीन वर्षापासून कालवा, नहर आणि पादचाऱ्यांचे विकास कामे झाली नाही. केर कचरा, झुडपी आणि गवतांनी तुंबली असल्याने जागोजागी पाणी अडणार आहे. पाणी पट्टी करातून १७ ते २० लाख रुपये वार्षिक देणाऱ्या या परिसरात नहरांची वाईट अवस्था शासकीय यंत्रणेने केली आहे. या शिवाय नहरांचे सिमेंट अस्तरीकरण वाहून गेले आहे. यामुळे पाणी वाटप प्रभावित होणार आहे. दरम्यान उजवा आणि डावा कालव्याचा प्रभार २५ व ३५ कि.मी. अंतरावर वास्तव करणाऱ्या शाखा अभियंता यांना देण्यात आलेला आहे. आधीच त्यांचेकडे अवाढव्य कामे असल्याने परिसरात त्यांची उपस्थिती नगण्य आहे. यामुळे २ अमिन सर्वेसर्वा झाली असून पाणी वाटपात वरिष्ठ अधिकारी फेरफटका मारताना टाळत असल्याने शेतकऱ्यांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे.चांदपूर जलाशयात ३६ फुट पैकी १४ फुट पाण्याची पातळी असल्याने, धान पिकांची रोवणी करण्यासाठी पाणी वाटप करण्याची शेतकरी ओरड करीत आहेत. या शिवाय बावनथडी नदी पात्रात सातत्याने पाण्याची पातळी वाढत असल्याने शेतकऱ्यांचे आशा वाढलेल्या आहेत. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात सध्या ५ पंपगृह पाण्याचा उपसा करीत असल्याने पुन्हा २ पंपगृह सुरु करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान चांदपूर जलाशयाचे पाणी वाटप करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नागपूर आणि भंडारा कार्यालयात महत्वपूर्ण बैठक सुरु झालेल्या आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी यांचे आदेशाची महत्वपूर्ण भूमिका राहणार आहे. कधी येणार पाहुणा?पाटबंधारे विभागात दोन्ही शाखा अभियंत्यांचे पदे प्रभारी आहेत. हजारो हेक्टर शेती ओलीताखाली असल्याने कंबरडे मोडणारे आहे. यामुळे या विभागात लाखांदूरच्या विभागातून एका शाखा अभियंत्यांचे स्थानांतरण झाले असताना हा पाहुणा पाणी वाटपात टेंशन घेण्याच्या स्थितीत नाही. यामुळे रूजू होण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. रिकाम्या खुर्च्या या शाखा अभियंत्यांची अद्यापही प्रतिक्षा करीत आहे. यामुळे कधी येणार हा पाहुणा, अशी चर्चा सिहोऱ्याच्या पाटबंधारे विभागात आहे.
पाणी वाटपाची जबाबदारी तीन अभियंत्यांवर
By admin | Updated: August 14, 2015 00:03 IST