शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

शिवसेनेच्या जिल्हा बंदला तुमसर, साकोलीत प्रतिसाद

By admin | Updated: March 2, 2017 00:17 IST

शेतीसाठी केवळ ८ तास वीज, वारेमाप वाढविलेले वीज बिल या मागणीला घेऊन शिवसेनेने पुकारलेल्या जिल्हा बंदला साकोली व तुमसर तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला.

भंडारा/साकोली/तुमसर : शेतीसाठी केवळ ८ तास वीज, वारेमाप वाढविलेले वीज बिल या मागणीला घेऊन शिवसेनेने पुकारलेल्या जिल्हा बंदला साकोली व तुमसर तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. उर्वरीत तालुक्यात मात्र अल्प प्रतिसाद लाभला. यावेळी संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी तुमसर येथे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात वीज बिलांची होळी केली. बंदच्या माध्यमातून विद्युत विभागाला धारेवर धरण्यात आले. घरगुतीसह अन्य विद्युत बिलातही वीज कंपनीने भरमसाठ वाढ केली आहे. दुसरीकडे शेतीसाठी केवळ आठ तास विजेचा पुरवठा केला जात आहे. विदर्भातच वीजेचे उत्पादन होत असताना याची झळ आपल्यालाच सोसावी लागत आहे. विद्युत विभागाच्या या हिटलरशाहीचा या जिल्हा बंदद्वारे निषेध करण्यात आला. जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी, भंडारा, साकोली, पवनी, लाखांदूर, लाखनी, अड्याळ, सानगडी, पालांदूर, जवाहरनगर हे काही प्रमाणात बंद राहिले. याप्रकरणी वीज विभागाने कारवाई न केल्यास शिवसेना आपल्या पद्धतीने जनसांदोलन उभारेल, वेळप्रसंगी विदर्भ बंद आंदोलन करू असा खणखणीत इशाराही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख इंजि. राजेंद्र पटले यांनी दिला आहे. या बंद मध्ये विशेष बाब म्हणजे विद्यार्थांच्या परीक्षा सुरु असल्यामुळे शाळा, कॉलेज व त्यांना सेवा देणाऱ्या एस. टी. सह अन्य अत्यावश्यक सेवा सुरू होती. व्यपारी प्रतिष्ठाने बंद होती. (लोकमत चमू)साकोलीत तहसीलदारांना निवेदन साकोली : साकोली शहरात कडकडीत बंद ठेवण्यात येऊन मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री यांना तहसिलदारांच्या मार्फत देण्यात आले. या बंदचे नेतृत्व माजी तालुका प्रमुख प्रकाश मेश्राम यांच्या नेतृत्वात करण्यात आला. यावेळी उपजिल्हाप्रमुख संदीप वाकडे, ज्येष्ठ शिवसेना नेते किशोर चन्ने, सुरेश गजापुरे, दिलीप सिंगाडे, चंद्रकांत चोले, प्रणय कांबळे यांनी शहरात मोटरसायकल रॅली काढली. शेतकऱ्यांना १६ तास वीज पुरवठा दयावा, घरगुती, व्यापारी यांना वाढविलेल्या अतिरिक्त आकार बंद करण्यात यावा या दोन मागण्यांचासमावेश आहे. यावेळी संजय सोनवाने, जय मल्लानी, कार्तिक चौबे, जगदिश मनगटे, उमेश वरकडे, आशिष चेडगे, योगेश गजापुरे, सोनु धुर्वे, कैलास मोटघरे, सुनिल बोधनकर, जांबाज पठाण, उमेर खान, मनोज साखरे, राहुल धांडे, रवि पंधरे व शिवसैनिक उपस्थित होते.