महाराष्ट्र वाहतूक सेनेचे भंडारा जिल्हा अध्यक्ष प्रमोद मेश्राम यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद हायस्कूल, कृष्णमुरारी कटकवार विद्यालय, पॉलिटेक्निक कॉलेज, जुने ग्रामपंचायत भवन सेंदूरवाफा, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा १ सेंदूरवाफा व शहरातील इतर सार्वजनिक स्थानावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी निसर्गप्रेमी, वृक्षप्रेमीही हजर होते. या वृक्षारोपण संकल्पनेत महाराष्ट्र वाहतूक सेना तालुका अध्यक्ष सुरेश गजापुरे, शहर अध्यक्ष मंगेश वैद्य, मुकेश खंदारे, प्रतिभा पारधी, सुनीता भैसारे, अनिल डोमळे, रितेश उके, नीलेश उईके, दीपक रामटेके, जितेंद्र उईके, विशाल जनबंधू, सुभाष मेश्राम व सर्व पदाधिकारी हजर होते, जिल्हा परिषद हायस्कूलचे प्राचार्य उमेश चोले, एसडी देशपांडे, राजेंद्र खोब्रागडे, डी.जी. रंगारी, तर कृष्णमुरारी कटकवार विद्यालयाचे प्राचार्य विजय देवगिरकर, क्रीडा शिक्षक शाहिद कुरैशी, प्रा. प्रशांत शिवणकर, शिवदास लांजेवार, शितल साहू, निलिमा बोरकर, प्रा. सोनवने, प्रा. बिसेन, संजय पारधी, बाबुराव उईके व रामदास शहारे यांनी सहकार्य केले.
साकोलीत दोन हजार वृक्षारोपणाचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:23 IST