शहरं
Join us  
Trending Stories
1
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
2
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
3
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
4
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
5
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
6
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
8
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
9
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
10
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
11
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
12
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
13
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
14
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
15
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
16
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
17
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
18
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
19
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
20
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...

Corona Virus in Bhandarar; भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना बाहेर फिरणे पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 19:16 IST

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन असताना रस्त्यावर फिरणाऱ्या तीन होम क्वारंटाईन व्यक्तींसह २७ जणांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन असताना रस्त्यावर फिरणाऱ्या तीन होम क्वारंटाईन व्यक्तींसह २७ जणांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणतेही कारण नसताना जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग करून ही मंडळी रस्त्यावर फिरताना आढळून आली.भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. विविध महानगरातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला. मात्र त्यानंतरही पवनी तालुक्यातील सोमनाळा बु. येथील श्रीधर श्रीपाद नंदापुरे (३२), साकोली लगतच्या सेंदूरवाफा येथील राजू दिलीप तलमले आणि साकोली तालुक्यातीलच पाथरी येथील खुशाल रामदास वलथरे (२८) हे होम क्वारंटाईन व्यक्ती रस्त्यावर फिरताना आढळून आले. त्यांच्याविरुद्ध अड्याळ आणि साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर जिल्हाधिकाऱ्यांच्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पवनी येथील सिंधी कॉलनीतील विशाल दुर्योधन मंडपे (२५), लाखांदूर तालुक्यातील तावशी येथील नरेंद्र मोनाजी फुंडे (२८), खेमराज माधव उपरीकर (३०), श्रावण तुळशीराम डोंगरवार (४२), खेमचंद श्रीपाद वाघाडे (३०), देवचंद वलीराम सोनवाने (३१), जगदीश कवडू वलथरे (३८), दिनेश नारायण सूर्यवंशी (२४), विलास मुखडन सूर्यवंशी (४०), जगदीश कुणाल वाघाडे (३२), लोकराम शिवा सोनवाने (३८), संदीप दयाराम भुसारी (२४), विलास देवराम फुंडे (३८), चेतन ताराचंद रामटेके (२६), मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथील राजेश सोमाजी निपाने, गौतम गोपाळा मेश्राम, तुमसर येथील स्वप्नील सुनील भिवगडे, सुकळी देव्हाडी येथील अंकुश गुलाब राऊत, खापा येथील सोपान सुरेश शेंडे (३२), मांगली येथील लोकेश शंकर पुंडे (२५), पिंपरी येथील ईश्वर नारबा बडवाईक (२८), परसवाडा येथील गज्जू भिक्षूक ठवकर आणि विलास मोहन कांबळे यांच्याविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मनाई आदेश असताना यातील अनेक जण वाहनाद्वारे भटकताना पोलिसांना आढळून आले. त्यांना बाहेर निघण्याचे कारण विचारले असता समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भंडारात खर्रा विक्रेत्यावर कारवाईसंचारबंदीच्या काळात किराणा दुकानात खर्रा विक्री करणाऱ्या पवनी तालुक्यातील भेंडाळा येथील एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमराज जगन्नाथ वैद्य (४५) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. तो भेंडाळा येथील आपल्या शिवशक्ती किराणा दुकानात खर्रा विकत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यावरुन पोलिसांनी धाड टाकली असता तेथे खर्रा घोटण्याची पाटी, कापड व इतर साहित्य जप्त करण्यात आले. पवनी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस