शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
3
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
4
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
5
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
6
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
8
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
9
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
10
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
11
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
12
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
13
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
14
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
15
Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?
16
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
17
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
18
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
19
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
20
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...

पावसाअभावी ‘जलाशये’ अजूनही तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2016 00:32 IST

जिल्ह्यात अजूनही धो-धो बरसणाऱ्या पावसाने हजेरी लावलेली नाही.

धो-धो पावसाची गरज : अर्ध्या पावसाळ्यानंतरही मध्यम प्रकल्पात ठणठणाठभंडारा : जिल्ह्यात अजूनही धो-धो बरसणाऱ्या पावसाने हजेरी लावलेली नाही. कधी रिमझिम तर कधी एखादा ठोक अशा प्रमाणात हजेरी लावणाऱ्या पावसामुळे पाणी जमिनीत मुरत असले तरी मध्यम आणि मोठ्या जलाशयांमध्ये अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. अर्धा पावसाळा संपला असला तरी या जलाशयांमध्ये ५० टक्केही पाणीसाठा नाही.यातच खरीप हंगामात वरथेंबी पावसावर अवलंबून असलेल्या अनेक शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट होत आहे. गतवर्षीपेक्षा यंदा पावसाची स्थिती चांगली राहील, असा अंदाज होता. मात्र हा अंदाज फोल ठरत आहे. बांध्यात रोवणीयोग्य पाणी साचत नसल्यामुळे शेतकऱ्यांना धानाची रोवणी कशी करावी असा प्रश्न पडला आहे.सध्या जिल्ह्यातील इटियाडोह धरण २९.८५ टक्के, शिरपूर जलाशय ३०.८४ टक्के, पुजारीटोला धरण ४०.५९ टक्के, कालीसराड ३६.४२ टक्के तचर मध्यप्रदेशातील संजय सरोवर ६४.६५ टक्के भरले असल्याची माहिती पाटबंधारे विभागातून देण्यात आली. सध्या संजय सरोवराचे दोन गेट ०.२१ मीटरपर्यंत उघडून ७०.७९ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. (प्रतिनिधी)मध्यम प्रकल्पातही जेमतेम साठाजिल्ह्यातील काही मध्यम प्रकल्पातही पाण्याचा ठणठणाठ दिसून येत आहे. बोदलकसा जलाशयात जलसाठा ७.४१ दलघमी असून त्याची टक्केवारी ४५.०३ आहे. चोरखमारा जलाशयात जलसाठा ३.४० दलघमी (१६.३६ टक्के) आहे. चुलबंद जलाशयात जलसाठा १.८९ दलघमी (१०.५४ टक्के) आहे. मानागड प्रकल्पात ०.६१ दलघमी (८.६१ टक्के) आहे. रेंगेपार प्रकल्पात ०.९३ दलघमी (२६.२० टक्के) आहे. संग्रामपूर २.३४ दलघमी (६०.५० टक्के) आहे. कटंगी ६.६४ दलघमी (७०.६६ टक्के) आहे. कलपाथरी २.२७ दलघमी (३४.४२ टक्के), उमरझरी १.६७ दलघमी (३०.३० टक्के) व खळबंदा प्रकल्पात २.७३ दलघमी (१७.०९ टक्के) जलसाठा आहे. २४ तासात १.२ मिमी पाऊसमागील २४ तासात जिल्ह्यात सरासरी केवळ १.२ मिमी पाऊस पडला आहे. १ जूनपासून आतापर्यंत सरासरी ५३६.६ मिमी एवढा पाऊस पडला आहे. गेल्या २४ तासात तालुकानिहाय पडलेला पाऊस व कंसात आजपर्यंत झालेला पाऊस असा आहे. गोंदिया तालुका निरंक (४२१ मिमी), तिरोडा निरंक (६१६.२ मिमी), गोरेगाव ०.४ मिमी (४८५ मिमी), आमगाव निरंक (४२५.२ मिमी), सालेकसा निरंक (५५२ मिमी), देवरी २ मिमी (६०८ मिमी), सडक-अर्जुनी ७.२ मिमी (६४३.८ मिमी), अर्जुनी-मोरगाव निरंक (५४२.१ मिमी) अशी पावसाची नोंद आहे.

जोरदार पावसाची प्रतीक्षा कायमजिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या तुलनेत बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. जून महिन्यात दगा देणाऱ्या पावसाने जुलै महिन्यात बऱ्यापैकी हजेरी लावली. संपूर्ण महिनाभर नियमितपणे पावसाचे हजेरी लावणे सुरू आहे. मात्र येणारा पाऊस रिमझिम स्वरूपाचा जास्त असतो. अधूनमधून एखादा ठोक येतो पण ते पाणी काही वेळातच जमिनीत मुरून जाते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या धानपिकासाठी रोवणीयोग्य पाणी बांधीत जमा होत नाही. यामुळे पूर्णपणे वरथेंबी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचे गणित बिघडत आहे. रोवणीसाठी आता काही दिवसच शिल्लक आहेत.