लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कमलेश भंडारी यांचे स्वागत करुन त्यांना जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाºयांच्या समस्याबाबद निवेदन देण्यात आले.सन २०१४ पासून आरोग्य कर्मचाºयांच्या प्रलंबित पदोन्नत्या तात्काळ करण्यात याव्यात, १२/२४ वर्ष कालबद्ध पदोन्नतीचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात याव्यात, आरोग्य कर्मचाºयांना दुसरा व चवथा शनिवारचा लाभ देण्यासंबंधीने स्वतंत्र परिपत्रक काढण्यात यावे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्या नावात बदल करून प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी असे संबोधण्यासंबंधी स्वतंत्र पथक काढावे, जि.प. आरोग्य विभागात प्रतिनियुक्तीवर असणाºया आरोग्य कर्मचाºयांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे, कर्मचाºयांची सन २०१६-१७ ची गोपनीय अहवालाची एक प्रत कर्मचाºयांना उपलब्ध करून द्यावी, संघटनेनी अथवा कर्मचाºयांनी केलेल्या पत्रव्यवहाराबाबद केलेल्या कारवाईची माहिती संघटनेला व कर्मचाºयांना कळविण्यात यावी व इतर आरोग्य कर्मचाºयांच्या समस्याबाबद निवेदन देण्यात आले. त्यावर लवकरच संघटनेची सभा लावण्यात येवून सर्व प्रश्न निकाली काढण्यात येतील, असे सकारात्मक आश्वासन देण्यात आले. शिष्टमंडळात संघटनेचे उपमहासचिव सूर्यकांत हुमणे, राज्य महिला अध्यक्ष रजनी वैद्य, जिल्हा अध्यक्ष विनय सुदामे, विभागीय सहसचिव मनिष वाहणे, उपाध्यक्ष मधुकर रुषेश्वरी, जिल्हा संघटक देवानंद नागदेवे, शैलेश जांभूळकर, अशोक डोंगरे, दिनेश मेश्राम, भगवान मस्के, प्रभू ठवकर व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
आरोग्य अधिकाºयांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 21:54 IST
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कमलेश भंडारी यांचे स्वागत करुन त्यांना जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाºयांच्या समस्याबाबद निवेदन देण्यात आले.
आरोग्य अधिकाºयांना निवेदन
ठळक मुद्देसन २०१४ पासून आरोग्य कर्मचाºयांच्या प्रलंबित पदोन्नत्या तात्काळ करण्यात याव्यात,....