विदर्भ पटवारी संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:55 AM2018-08-17T00:55:12+5:302018-08-17T00:56:00+5:30

विदर्भ पटवारी संघ नागपूर शाखा साकोलीच्या वतीने तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या विविध प्रलंबित मागण्या तात्काळ मंजुर करण्यात याव्यात, यासाठी उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.

Request for District Collector of Vidarbha Patwari Sangh | विदर्भ पटवारी संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

विदर्भ पटवारी संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : विदर्भ पटवारी संघ नागपूर शाखा साकोलीच्या वतीने तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या विविध प्रलंबित मागण्या तात्काळ मंजुर करण्यात याव्यात, यासाठी उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
यापूर्वी संघटनेतर्फे अनेकदा निवेदन सादर करण्यात आले. मात्र अजुनपर्यंत मागण्या पूर्ण करण्यात आली नाही. त्यामुळे तलाठ्यांवर सातत्यपणे अन्याय होत आहे. तलाठ्यांच्या प्रलंबित मागण्यात तलाठी संवर्गाचे पदोन्नती बाबद विचार करणे, कालबद्ध पदोन्नती देण्यात यावी, स्थायीत्व प्रमाण मिळण्यात यावे, नादुरूस्त लॅपटॉप दुरूस्तीकरून नवीन लॅपटॉप देण्यात यावे, निलंबित तलाठ्यांना शासनसेवेत पुन:प्रस्थापीत करण्यात यावे, अकार्यकारी पदावर नियुक्त केलेल्या तलाठ्यांना तात्काळ तलाठी साझ्यावर देण्यात यावे अशी मागणी आहे. मागण्या मान्य न झाल्यास २१ पासून तलाठी व मंडळ अधिकारी संप पुकारणार आहेत.
शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष सिराज खान, सचिव जे.एच. गेडाम, आर.व्ही. मंडले, रिकेश देशमुख, टी.आर. गिºहेपुंजे, शैलेश कपासे, नरेंद्र चरडे, शेखर ठाकरे, एम.एम. उईके, व्ही.के. मेश्राम, एम.आर. कारेमोरे, एन.सी. मदनकर, टी.डी. मेश्राम, एस.एस. साखरवाडे, डी.एस. शिंदे, जी.एस. मेश्राम, एस.पी. बिसेन, व्ही.टी. हटवार आदींचा समावेश होता.

Web Title: Request for District Collector of Vidarbha Patwari Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.