शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

निराधार योजनेचे मानधन रखडले; गरजू लाभार्थी मानधनाच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 13:41 IST

लाभार्थ्यांची फरफट : आर्थिक विवंचनेचा करतायेत सामना

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : विधवा, दिव्यांग, परितक्त्या, निराधार, घटस्फोटित, वयोवृद्ध घटकांना शासनातर्फे जीवनज्ञापन करण्यासाठी मासिक मानधन दिले जाते. परंतु, गत काही महिन्यांपासून जिल्ह्यात गरजू लाभार्थी मानधनाच्या प्रतीक्षेत आर्थिक विवंचनेचा सामना करीत आहेत. या महिन्यात सणासुदीचे दिवस असताना त्यांना मात्र दोनवेळच्या जेवणासाठी हाल सोसावे लागत आहेत.

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन व राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य, वयोवृद्ध कलाकार मानधन आदी योजना समाजातील वंचित घटकांसाठी राबविण्यात येतात. 

या गरजू व्यक्तींना नियमित मानधन मिळावे, असे अपेक्षित आहे. परंतु, ते बहुधा एकत्रच मिळते. गत काही महिन्यांपासून या लाभार्थ्यांचे मानधन अद्याप मिळाले नाही. शासनाने अनुदान जमा न केल्याने ही स्थिती उ‌द्भवली असून, यामुळे मानधनावर अवलंबून असणाऱ्या गरजूंची आर्थिक ओढाताण सुरू आहे. श्रावणबाळ योजनेचे अधिकाधिक लाभार्थी वृद्ध आहेत. ६५ वर्षांवरील या वृद्धांना या वयात औषधपाण्याची गरज असते. पेन्शन न मिळाल्याने त्यांचा दवाखाना थांबला आहे. याशिवाय दैनंदिन खर्चाचीही अडचण झाली आहे. पेन्शन कधी येणार, याची विचारणा करण्यासाठी लाभार्थी तहसील कार्यालयात येरझाऱ्या घालत आहेत. 

अनुदानच न आल्याने कर्मचाऱ्यांनाही उत्तर देणे कठीण झाले आहे. हाती पैसाच नसल्याने सण साजरे करणे दूर सध्या त्यांना रोज पोट भरण्याची भ्रांत पडली आहे. विशेष सहाय्य योजनेंतर्गत मानधन सुरू ठेवण्यासाठी योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी शासनाने हयातीच्या दाखल्याबरोबरच उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागतो. अपंग, वृद्ध, निराधार लाभार्थ्यांनी मोठा मनस्ताप सहन करून या अटींची पूर्ती केली. गरीब, निराधार, वृद्ध, विधवा व परितक्त्या, गरीब लाभार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. परंतु, तरीही त्यांना नियमित मानधन देण्यात आडकाठी? असा प्रश्न लाभार्थ्यांनी केला आहे. 

बँक, तहसीलच्या वाढल्या चकरा याबाबत तहसील कार्यालयातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी, अनुदान आले नसल्याने ३ महिन्यांचे पेन्शन प्रलंबित असल्याला दुजोरा दिला. हे लाभार्थी चौकशीसाठी बँकेत व तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिजवित आहेत.

काँग्रेसने वेधले प्रशासनाचे लक्ष भंडारा तालुका महिला काँग्रेस कमिटीची अध्यक्षा स्वाती हेडाऊ यांच्या नेतृत्वात निराधार व वृद्ध कलाकार योजनेच्या थकीत मानधनाकरिता मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन उपजिल्हाधिकारी लोंढे यांना सोपविण्यात आले. यावेळी इंटक शहराध्यक्ष स्नेहा भोवते, महिला काँग्रेस तालुका उपाध्यक्ष स्नेहा रामटेके, नम्रता बागडे, सुभद्रा हेडाऊ, इंद्रमाती कोल्हे, सारू मेश्राम, तारा डुंभरे, वृंदा बागडे, श्यामदास हेडाऊ, बुधा मेश्राम आदी लाभार्थी उपस्थित होते.

  

टॅग्स :bhandara-acभंडारा