महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका भंडाऱ्याची शिष्टमंडळ सभा गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांच्या सोबत घेण्यात आली. त्यात अनेक शिक्षकांनी कनिष्ठ सहायक ढबाले यांच्यासंबंधी अनेक तक्रारी केल्या.
खंडविकास अधिकारी नूतन सावंत यांना निवेदन देताना शिक्षक नेते दिलीप बावनकर, जिल्हा सरचिटणीस सुधीर वाघमारे, संचालक शंकर नखाते, यामिनी गिऱ्हेपुंजे, तालुकाध्यक्ष दशरथ जिभकाटे, सरचिटणीस ईश्वर निकुडे, नामदेव गभणे, प्रकाश चाचेरे, दिलीप गभणे, संजय बनकर, प्रमोद गेडाम, वसंता काटेखाये, रवींद्र फंदे, साधना जांभूळकर, गीता तलमले, तुलसीदास रुषेसरी, तुलसी हटवार, देवीदास लोहकर, सुनील चव्हाण, भोजराज अंबादे, विलास दिघोरे, मधुकर लेंडे, अनिल दहिवले, कैलास बुद्धे, नरेंद्र कोहाड, सोनीराम लांजेवार, राजेश देशमुख, दिनेश खोब्रागडे, धनराज साठवणे, शोभा बारई, प्रभू तिघरे उपस्थित होते.