शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मानव धर्मात येणाऱ्यांना भगवंताची प्राप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 22:09 IST

महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी प्रत्येक व्यक्तीला दु:ख, चिंता, व्यसनापासून मुक्ती मिळण्यासाठी मानव धर्माची स्थापना केली. मानवधर्मात येणाऱ्या प्रत्येक परमात्मा एक सेवकास भगवंत प्राप्तीचा मार्ग मिळतो व त्यापासून दु:ख, गरीबी, वाईट व्यसन व अंधश्रद्धा पासून नेहमीची मुक्तता होते.

ठळक मुद्देलता बुरडे : मोहाडीत सेवक संमेलन, हजारो सेवकांची उपस्थिती

आॅनलाईन लोकमतमोहाडी : महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी प्रत्येक व्यक्तीला दु:ख, चिंता, व्यसनापासून मुक्ती मिळण्यासाठी मानव धर्माची स्थापना केली. मानवधर्मात येणाऱ्या प्रत्येक परमात्मा एक सेवकास भगवंत प्राप्तीचा मार्ग मिळतो व त्यापासून दु:ख, गरीबी, वाईट व्यसन व अंधश्रद्धा पासून नेहमीची मुक्तता होते. यशाचा मार्ग सापडतो. त्यामुळेच आज लाखो लोकांनी मानव धर्माचा स्वीकार केला आहे, असे प्रतिपादन आध्यात्मिक प्रमुख व मानव धर्म प्रचार व प्रसारीका लता बुरडे यांनी केले.मोहाडी येथे आयोजित परमात्मा एक सेवक सम्मेलनाप्रसंगी त्या बोलत होत्या. संमेलनाचे उद्घाटन लता बुरडे यांच्या हस्ते यशवंतराव ढबाले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी माजी खासदार नाना पटोले, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, प्रमोद तितीरमारे, आशिष पातरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड, ठाणेदार सुधाकर चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष कल्याणी भुरे, रिलायन्स जनरल मॅनेजर हरीश रायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.याप्रसंगी बोलताना नाना पटोले यांनी, परमात्मा एक सेवक मंडळ व्यसनमुक्ती व ग्रामस्वच्छता यासारखे लोकोपयोगी कार्य करीत आहे. परंतु याऊलट शासन दारूच्या दुकाने उघडण्यासाठी न्यायालयाच्या आदेशातून पळवाट काढून दारूची दुकाने उघडून युवकांचे जीवन उधवस्त करीत आहे. जे काम शासनाने करायला हवे, ते काम परमात्मा एक मंडळातर्फे केल्या जात असल्याचे प्रतिपादन केले.विशेष उल्लेखनीय कार्य करणारे नानाजी दमाहे सुखराम रोटके, मुलचंद जुमळे, सुखराम शिवणकर, हरलाल शरणांगते, केशवराव गभने, बाबुराव थोटे, शंकर तरारे, लक्ष्मीकांत तलांडे, वच्छला नागोसे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. स्वागत गित शिवांगी बुरडे हिने प्रस्तुत केले. तत्पूर्वी शोभायात्रेत अनेक प्रकारच्या वाहनांना सजविण्यात आले होते. सर्वाेत्कृष्ट झाकी प्रस्तुत करणाºयाला प्रथम ११ हजार १११, द्वितीय ९ हजार एक, तृतीय ७ हजार एक, चतुर्थ ५ हजार एक, पाचवा ३ हजार ५०१, सहावा दोन हजार ५०१ रूपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर काही झाँकींना स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.प्रास्ताविक मोरेश्वर सार्वे यांनी केले. तर संचालन उमेश भोंगाडे, इंद्रपाल मते यांनी केले. कार्यक्रमाला जवळपास ४० हजार सेवकांची उपस्थित होती. गर्दीच्या नियंत्रणासाठी ठाणेदार सुधाकर चव्हाण, उपनिरीक्षक ओमप्रकाश गेडाम, पोहवा जगन्नाथ गिरीपुंजे व मंडळाच्या स्वयंसेवकांनी उत्तम कामगिरी बजावली.कार्यक्रमाला नरेश सव्वालाखे, मोरेश्वर सार्वे, कंठीराम पडारे, राजु पिल्लारे, नत्थु कोहाड, एकनाथ जिभकाटे, राजु माटे, गुरूदास शेंडे, रविकुमार मरसकोल्हे, सरस्वता माटे, व्यवस्थापक भगवान पिल्लारे, श्रीकृष्ण झंझाड, लक्ष्मण माहुले, कैलास ढबाले यांच्यासह सेवकांनी सहकार्य केले.