शहरं
Join us  
Trending Stories
1
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
2
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
3
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
4
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
5
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
6
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
7
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
8
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
9
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
10
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
11
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
12
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
13
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
14
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
15
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
16
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
17
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
18
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
19
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
20
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

वाचन प्रेरणा दिन दप्तरमुक्त दिन म्हणून होणार साजरा

By admin | Updated: October 14, 2016 03:35 IST

मुलांना वाचनाची नियमित सवय व गोडी लागावी यादृष्टीने शासनाने १५ आॅक्टोंबर हा माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन

मुलांना वाचनाची गोडी लावणार : समाजातील सर्व घटकांचा सहभागभंडारा : मुलांना वाचनाची नियमित सवय व गोडी लागावी यादृष्टीने शासनाने १५ आॅक्टोंबर हा माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी हा दिवस वाचन प्रेरणा दप्तरमुक्त दिवस म्हणून साजरा करायच्या सूचना सर्व शाळांना देण्यात आल्या आहेत. अशा आशयाचे परिपत्रक शिक्षण अधिकारी प्राथमिक जि. प. भंडारा यांनी सर्व शाळांना पाठविले आहे.१५ आॅक्टोंबर या दिवशी इयत्ता बारावी पर्यंतच्या प्रत्येक मुलामागे किमान दहा छोटी पुस्तके ( १६ पानी ) वाचावित असे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक शाळेत पर्याप्त संख्येने मुलांच्या वयानुरुप वाचनोपयोगी पुस्तके उपलब्ध ठेवावीत. प्रत्येक तालुक्यात वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाचे प्रभावी आयोजन करावे. सर्व घटकांना सहभागी करुन घ्यावे व जिल्ह्यातील सर्व शाळांना पुरेशा प्रमाणात पुस्तकांच्या उपलब्धतेबाबतचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.वाचन प्रेरणा चळवळ रुजविण्यासाठी मुलांना वयानुरुप पुस्तक उपलब्ध करुन द्यावीत. एखाद्या शाळेत पुस्ताकांची संख्या जास्त असेल त्या शाळांनी कमी पुस्तके असणाऱ्या शाळांना वाचन प्रेरणा दिवसासाठी ती उपलब्ध करुन द्यावीत. बोलीभाषेची पुस्तके आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन द्यावीत. वाचन प्रेरणा दिवसाच्या पूर्वी पुस्तक दिंडीचे आयोजन करण्यात यावे. नागरिक, पालक, शिक्षणप्रेमी यांच्याकडून पुस्तके, देणगी स्वरुप मिळवावीत, असेही त्यात म्हटंले आहे. संगणक-टॅबलेट इत्यादीवर आॅनलाईन पध्दतीने अधिकृत अ‍ॅप्सद्वारे मुलांना प्रोजेक्टरच्या माध्यमातून पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करुन देण्यात यावीत. या उपक्रमात समाजातील सर्व घटकांना सहभागी करुन घ्यावे, असे डायटचे प्राचार्य अभय परिहार यांनी कळविले आहे. वाचन प्रेरणा दिवशी कोणतेही धार्मिक ग्रंथ त्यावर आधारित मुल्य शिक्षणाची पुस्तके, विवादित पुस्तके, भितीपत्रके, आक्षेपार्ह मजकूर आदी पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात येवू नये, अशा शासनाच्या सूचना आहेत. (नगर प्रतिनिधी)