शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

रात्रभर चालून गाठली पोलंडची सीमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2022 05:00 IST

युक्रेनमधील भयानक वास्तव समोर येत आहे. शुक्रवारी एका बंकरमध्ये त्यांनी आश्रय घेतला होता. त्यानंतर सायंकाळी त्यांना पोलंड सीमेवर जाण्यास सांगण्यात आले. नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीत शिकणारे शंभरावर विद्यार्थी शुक्रवारी सायंकाळी टॅक्सीच्या मदतीने पोलंडच्या सीमेकडे निघाले. मात्र, टॅक्सी चालकानेही त्यांना ३५ किलोमीटर आधीच सोडून दिले. त्यामुळे हे सर्व विद्यार्थी कडाक्याच्या थंडीत ३५ किलोमीटर अंतर चालत पोलंडच्या सीमेवर पोहोचले. 

तथागत मेश्रामलोकमत न्यूज नेटवर्कवरठी : वसतिगृहातून पोलंड सीमेवर जाण्याचे फर्मान मिळाले. कसेबसे टॅक्सी करून सायंकाळी ५ वाजता प्रवास सुरू झाला. टॅक्सी चालकाने ३५ किलोमीटर आधीच उतरवून दिले. कडाक्याच्या थंडीत रात्रभर ३५ किलोमीटर अंतर चालून सीमा गाठली. परंतु आम्हाला मदत मिळत नाही. काका आम्हाला वाचवा, आम्हाला काही सुचत नाही, असा भावनिक संदेश वरठी येथील हर्षित चौधरीने शनिवारी पाठविला. या संदेशाने पालकांच्या पायाखालची जमीन सरकली आणि घरी चिंतेचे वातावरण पसरले.वरठी येथील सनफ्लॅग कंपनीतील महाव्यवस्थापक अरुणकुमार चौधरी यांचा मुलगा हर्षित सध्या युक्रेनमधील पोलंड सीमेवर अडकला आहे. तो तीन महिन्यांपूर्वी लव्हिव्ह शहरात एमबीबीएस करण्यासाठी गेला होता. परंतु युद्ध सुरू झाले आणि तो तेथेच अडकला. त्याने आपल्या वडिलांना ऑडिओ क्लिप पाठविली असून, युक्रेनमधील भयानक वास्तव समोर येत आहे. शुक्रवारी एका बंकरमध्ये त्यांनी आश्रय घेतला होता. त्यानंतर सायंकाळी त्यांना पोलंड सीमेवर जाण्यास सांगण्यात आले. नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीत शिकणारे शंभरावर विद्यार्थी शुक्रवारी सायंकाळी टॅक्सीच्या मदतीने पोलंडच्या सीमेकडे निघाले. मात्र, टॅक्सी चालकानेही त्यांना ३५ किलोमीटर आधीच सोडून दिले. त्यामुळे हे सर्व विद्यार्थी कडाक्याच्या थंडीत ३५ किलोमीटर अंतर चालत पोलंडच्या सीमेवर पोहोचले. या काळात काही जणांची प्रकृती खालावली. काहींचे मानसिक संतुलन ढासळले. आता पोलंडने सीमा बंद केल्याने जायचे कुठे? असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे.

मुलाच्या चिंतेत पालकांचे बेहाल- युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या हर्षित चौधरी यांच्या वडिलांचा जीव मुलाच्या चिंतेने बेजार झाला आहे. कोणतेही काम सुचेनासे झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत मुलाला कसे भारतात आणता येईल, याचीच चिंता त्यांना सतावत आहे.संपर्क क्रमांक कुचकामी- युक्रेनमध्ये अडकलेल्या हर्षितसह काही विद्यार्थ्यांना मदतीसाठी संपर्क क्रमांक देण्यात आले. त्यावर या विद्यार्थ्यांनी संपर्क साधला. पण त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. कडाक्याच्या थंडीत आज हे विद्यार्थी भारतात कसे परतावे, या विवंचनेत आहेत.भावी डाॅक्टर भोगताहेत मरणयातना- उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहत युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले भावी डाॅक्टर तेथील परिस्थितीने आता मरणयातना भोगत आहेत. पोलंड सीमेकडे थेट युद्ध नसले तरी युद्धजन्य परिस्थिती आहे. संपर्क साधणेही नाही. खाण्याच्या वस्तूंचाही तुटवडा आहे. अशा स्थितीत या सर्व विद्यार्थ्यांना मायदेशाची ओढ लागली आहे. 

 

टॅग्स :Studentविद्यार्थीwarयुद्ध