शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

पक्का रस्ता खोदून तयार केला कच्चा रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:25 AM

कच्चे रस्ते डांबरी, सिमेंटचे होताना सर्वांनीच बधितले आहे. मात्र गुळगुळीत डांबरी रस्ता खोदून मुरुमाचा रस्ता तयार करण्याचा प्रकार कुणी बघीतला नसेल. हा अजब प्रकार बघायचा असेल तर तुम्हाला भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौकात यावे लागेल.

ठळक मुद्देअजब प्रकार : जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक रस्ता दुपदरीकरणाचे भिजत घोंगडे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कच्चे रस्ते डांबरी, सिमेंटचे होताना सर्वांनीच बधितले आहे. मात्र गुळगुळीत डांबरी रस्ता खोदून मुरुमाचा रस्ता तयार करण्याचा प्रकार कुणी बघीतला नसेल. हा अजब प्रकार बघायचा असेल तर तुम्हाला भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौकात यावे लागेल. वर्दळीच्या या रस्त्याचे दुपदरीकरण रखडल्यानंतर आता तात्पुरता मुरुमाचा रस्ता करुन पुन्हा नागरिकांना मनस्ताप देण्याचा हा प्रकार आहे.शहरातील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक या मार्गाचे दुपदरीकरण सध्या शहरात चर्चेचा आणि वादाचा विषय झाला आहे. बरोबर महिन्याभरापूर्वी या रस्त्याच्या चौपदरीकरण कामासाठी खोदकाम सुरु झाले. अवघ्या तीन दिवसात अर्धा किलोमीटर रस्ता एका बाजुने खोदुन काढला. त्यानंतर अचानक रस्त्याचे काम बंद झाले. नगर परिषदेचे नाहरकत प्रमाणपत्र घेतले नाही म्हणून आक्षेप घेत काम थांबविले. महिन्याभरापासून या मार्गावरुन जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडी आणि अपघाताने या रस्त्यावरुन जाताना नागरिक चांगलेच धास्तावलेले दिसतात.आता या रस्त्याचे काम कधी सुरु होईल हे कुणालाही सांगता येत नाही. शहराच्या विकासाच्या मुद्दावरुन काम थांबविल्याचा दावा नगराध्यक्षांनी केला. पंधरा दिवसांपूर्वी महामार्ग प्राधिकरण आणि नगर परिषद यांच्यात बैठक होवून तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यात अपेक्षित यश आले नाही. एका बाजूने खोदलेला रस्ता आणि दुसऱ्या बााजूने भरधाव वाहतूक असे चित्र आहे. अशातच बुधवारी या रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाल्याचे चित्र दिसले. ट्रकमधून या ठिकाणी मुरुम आणणे सुरु झाले. नागरिकांना दिलासा मिळाला. परंतु हा दिलासा औटघटकेचा ठरला. कारण या रस्त्याचे सिमेंटीकरण नाही तर मुरुम टाकून तात्पुरता तयार केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. मुरुम टाकून खोदलेला रस्ता जुन्या रस्त्याच्या समतल आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.मुरुमाचा हा तलकादू रस्ता म्हणजे नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणे होय. जो काही वाद असेल तो वाद मिटवून नियोजनाप्रमाणे या रस्त्याचे काम होणे गरजेचे आहे. परंतु त्याऐवजी मुरुमाचा रस्ता तयार केला जात आहे. या रस्त्यामुळे अवघ्या आठ दिवसातच धुळीचे प्रचंड लोट उठतील. एखादा पाऊस आला तर चिखल होईल. त्यातुन पुन्हा अपघाताची शक्यता बळावेल.बावीस अतिक्रमणधारकांना नोटीसजिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक या रस्त्याच्या दुपदरीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्यावरील २२ अतिक्रमण धारकांना नोटीस बजावली आहे. तीन दिवसाच्या आत संबंधितांनी आपले अतिक्रमण काढून टाकावे, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. संबंधित नोटीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या उपविभागीय अभियंत्यांनी बजावली आहे. एकीकडे रस्त्याचे काम थांबले असून दुसरीकडे या नोटीस बजावल्याने आता नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.रस्ता बांधकामाचे कवित्वशहरातील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक या रस्त्याचे कवित्व सध्या सुरु आहे. प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभावी हा रस्ता अपुर्ण आहे. एकदा मुरुम टाकलेल्या रस्त्यावरुन वाहतूक सुरु झाली की कुणी त्यावर आवाज उठविणार नाही आणि हा रस्ता पुर्णत्वास जाण्यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनी सामोपचाराने या रस्त्यावर मंथन करुन प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे. परंतु तसे होताना सध्या तरी दिसत नाही.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक