शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

जिल्ह्यात शुद्ध पाण्यासाठी रान पेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 05:00 IST

आता विहिरी किंवा बोअरवेलच्या पाण्यावर तहान भागविण्याची वेळ नागरिकांवर येऊन ठेपली आहे. सधन कुटुंबाकडे महागडे फिल्टर आहेत, त्यांना याचा काहीच फटका नाही.

ठळक मुद्देपाण्यासाठी सर्वांची धावपळ : प्रकरण आरओ केंद्रांना सील ठोकण्याचे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्ह्यात सर्वत्र सुरू असलेल्या पाण्याच्या आरओ केंद्रांना सील ठोकण्यात आले आहे एकट्या भंडारा शहरात ३१ केंद्रांना सील ठोकल्यानंतर आता शुद्ध पाण्यासाठी नागरिकांनी रान पेटविले आहे.आरोच्या किंबहुना नळाच्या पाण्यावर विसंबून असणाऱ्यांनी आता दूषित पाणीच प्यावे आणि आजाराला सामोरे जावे काय , असा प्रश्न विचारला आहे. दुसरीकडे मानकानुसार पाण्याचे वितरण होत नसल्याची बाब चर्चेला येत आहे. हा मुद्दा सध्या तरी जिल्हावासियांसाठी कळीचा ठरत आहे. भंडारा शहरासह जिल्ह्यात शंभरच्यावर आरो (रिव्हर्स आसमोसिस) केंद्र आहेत. येथून पाण्यावर प्रक्रिया कॅन किंवा जारमधून पाणी विकले जाते. पाच रुपयात २० लिटर पाणी देण्याचा हा व्यवसाय कित्येक वर्षांपासून सुरू आहे. यातही थंड पाण्याचा व्यवसाय वेग़ळाच आहे.जिल्ह्यात पाण्याचे मुबलक स्त्रोत असले तरी जिल्हावासियांना नियमित व शुद्ध पाण्यासाठी नेहमी तरसावे लागले आहे. भंडारा शहरात दशकभरापासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यातच काळेकुट्ट तर कधी पिवळसर तर कधी फेसाळयुक्त पाणी नळाद्वारे येत आहे. अशा स्थितीत अनेक नागरिकांनी पाच रुपयात वीस लिटर शुद्ध पाणी मिळत असेल तर दूषित पाणी का बर यावे यासाठी आरोकडे वाटचाल सुरू केली. अनेकांना आरओच्या पाण्याची सवय लागली. मात्र दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यभरातील आरोग्य केंद्र बंद करण्यात आले. त्यात भंडारा शहरात नगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागतील कर्मचारी यांनी ३१आरो केंद्रांना गत दोन दिवसात सील ठोकले.आता दूषित पाणी प्यायचे काय?दोन दिवसांपासून आरओ केंद्र बंद असल्याने शुद्ध पाण्यासाठी लोकांची धावपळ दिसून येत आहे. काही नागरिक कॅन किंवा मोठी वॉटर बॅग घेऊन जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी आणत असल्याचे दृश्य आहे. आता विहिरी किंवा बोअरवेलच्या पाण्यावर तहान भागविण्याची वेळ नागरिकांवर येऊन ठेपली आहे. सधन कुटुंबाकडे महागडे फिल्टर आहेत, त्यांना याचा काहीच फटका नाही. मानकांनुसार व गुणवत्तेनुसार पाणी वाटप करण्यावर भर असल्यामुळे पाण्याचे आरोग्य केंद्र लवकर सुरू होणार याबाबत तरी शाश्वती दिसत नाही. दरम्यान आरोमधून येणाऱ्या पाण्यात टीडीएसची मात्रा किती प्रमाणात असावी याबाबतही विविध मते व्यक्त केली जात आहे मात्र ही मात्रा दीडशे ते दोनशे ह्यपर्सेंटह्ण एवढ्या दरात असावी असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत आहे. १०० पेक्षा कमी याची मात्रा असेल तर पाण्याला चव नसते, असे स्पष्ट झाले आहे. गुणवत्तेनुसार पाण्याचे वितरण होत आहे किंवा नाही याची शहानिशा अन्न व औषधी प्रशासनाने कधीच केली नाही, असे म्हणने वावगे ठरणार नाही. आरो केंद्र संचालकांवर खापर फोडण्यात आले आहे.